राजापूर महाविद्यालयात शिक्षक व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर परिसंवाद!

संगमनेर प्रतिनिधी
प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शनिवार दिनांक 30/04/2022 रोजी अंतर्गत गुणवत्ता हमी समिती आणि इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी व्यक्तिमत्त्व विकास या विषयांतर्गत एक दिवसीय परिसंवाद आयोजित करण्यात आला.
यामध्ये प्रा .जाधव सर यांनी प्रभावी संभाषण कौशल्ये या विषयावर माहिती देऊन दैनंदिन जीवनात याचा वापर कसा करावा हे स्पष्ट केले . परिसंवादाच्या दुसऱ्या भागात प्रा .फलके मॅडम यांनी देहबोलीतून माहितीचे संप्रेषण कसे होते हे विविध उदाहरणातून स्पष्ट केले .सदर कार्यक्रमासाठी प्रागतिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष . रामनाथ हासे,संचालक मुरलीधर हासे,भाऊसाहेब हासे,सुखदेव खतोडे,बाबासाहेब गायकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वाळुंज शितल आणि प्रा.भालेराव अश्विनी यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.शितल वाकचौरे यांनी केले.प्राचार्य डॉ सुभाष कडलग यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.अतिथी परिचय प्रा.हासे सविता यांनी तर आभार प्रा.संगीता भवर यांनी मांडले. अतिथी सत्कार वाचन प्रा.वैभव गडाख यांनी केले.या परिसंवाद कार्यक्रमाला भाउसाहेब हासे यांनी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी समितीच्या प्रमुख डॉ .संगिता जागींड,प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.