अॅड्. मनोहर देशमुख महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंधात्मक सप्ताह साजरा

विलास तुपे
राजूर:-प्रतिनिधी
अँड्. एम.एन.देशमुख महविद्यालयात रँगिंग प्रतिबंधात्मक सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे हे होते.रॅगिंग हां शब्द ग्रामीण आदिवासी भागता अदयाप जरी माहिती नसला तरी रॅगिंग प्रकार शहरी महाविद्यालयामध्ये खूप वाढीस लागले आहेत.त्यास प्रतिबंध करणे प्रत्येक विद्यार्थांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन राजूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रविण दातरे यांनी केले.
अॅड्. एम.एन देशमुख महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ,राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने आयोजित रँगिंग प्रतिबंधात्मक सप्ताह उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्रीलंका, भारत, पाकिस्तान व अफगाणिस्तान हे रँगिंग बाबत सर्वात जास्त प्रभावित देश आहेत असेही ते म्हणाले.

एखाद्याला अवमानास्पद वागणूक, मनाविरुद्ध कृत्य अमानवी गैरप्रकार, मानसिक दडपण हे रँगिंग चे प्रकार असून रँगिंग केली तर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो असे अँड्. दत्ता निगळे यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात सांगितले.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सप्ताह निमित्ताने राजूर पोलिस स्टेशन च्या महिला पोलिस अधिकारी मा.रोहिणी वाडेकर, मा.अशोक गाडे हे ही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा.डॉ. व्ही.एन.गिते यांनी केले .प्रमुख पाहुणे यांचा परिचय डाॅ. लहु काकडे यांनी करून दिला. आभार रासेयोचे अधिकारी का प्रा.बी.के.थोरात यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. शिंदे एम.बी.,प्रा.नवले व्हि.बी.,प्रा.के.जे.काकडे,प्रा.कासार सर,व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.