खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आरोग्य जनजागृती मोहीम.
अकोले/प्रतिनिधी –
जुन महिना हा शासन या स्तरावर हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा केला जातो.त्या अनुषंगाने अकोले तालुक्यातील खिरविरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आरोग्य जनजागृती मोहिम राबविण्यात आली.गावातील ग्रामसभा,शालेय विद्यार्थ्यांना किटकजन्य जसे मलेरिया,डेंग्यू,चिकणगुनिया इत्यादी डासांपासून होणाऱ्या आजार,प्रतिबंधात्मक उपाय, उपचार व घ्यावायची काळजी या बाबत माहीती देण्यात आली.तसेच गावात सर्वेक्षण करून पाणी साठविण्याचे भांडी,ड्रम ,हौद,टाक्या आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळून स्वच्छता करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.खिरवीरे गावात तसे कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. तसेच डेंग्यू चा डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालून उत्पत्ती करित असल्याने खिरविरे येथील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात तसेच इतर शाळेवर विद्यार्थ्यांना डासांचे जीवनचक्र समजावून सांगून डास जीवनचक्र खंडित करण्यासाठी गप्पी मासे पाळणे,हौद,टाक्या,रांजण, नारळाच्या करवंट्या इत्यादी मध्ये पावसाचे पाणी साठू न देणे.मच्छरदानी चा वापर करणे इत्यादी उपाययोजनंबाबत माहिती दिली.
तीव्र ताप,डोकेदुखी,हातपाय दुखी,उलट्या मळमळ अशी लक्षणे दिसल्यास डेंग्यू ,चिकणगुनिया,मलेरिया झालाच तर तात्काळ आरोग्य टीम ला संपर्क साधून उपचार घेण्याबाबत आव्हान करण्यात आले.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.गोकुळ गवांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवक डॉ.यादव तसेच डॉ.ओहोळ यांनी जनजागृतिपर मार्गदर्शन केले. यावेळी विदयालयाचे प्राचार्य मधुकर मोखरे तसेच सर्व शिक्षक यांनी आरोग्य टीमचे आभार मानले.