धेय ठरवुन योग्य तो अभ्यास आणि प्रयत्न करून सफल व्हावे – नाशिक रोटरी चे अध्यक्ष ओमप्रकाश रावत
नाशिक -रोटरी क्लब ऑफ नासिक तर्फे रोटरी युथ लीडर्स अवॉर्ड्स अर्थात रायला अंतर्गत एक दिवस स्वप्नातला एक आगळा वेगळा कार्यक्रम दिनांक १५/११/२०२४ बि. एल. व्हि. डि. हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेमधील विद्यार्थ्यांच्या नेहमीच्या दिनक्रमातुन जरा वेळ काढून एका वेगळ्या दुनियेत नेणारा असा हा कार्यक्रम आहे.विद्यार्थ्यां मध्ये नेत्रूत्व गुणाची वाढ व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा,नवनवीन क्षेत्रांमधील आद्यवत ज्ञान प्राप्त व्हावे, आयुष्यत काही तरी धेय ठरवुन त्यासाठी योग्य तो अभ्यास आणि प्रयत्न करून सफल व्हावे हाच उद्देश या कार्यक्रमाचा आहे असे मनोगत रोटरी क्लब ऑफ नाशिक अध्यक्ष ओमप्रकाश रावत हयानी व्यक्त केले.
. उर्मी दिनानी यांनी विद्यार्थ्यांकडून ध्यान क्रिया करवून घेतल्या. रोटे.सागर भदाणे यांनी विद्यार्थ्याना आयुष्यात आनंदी कसे राहता येईल, त्यासाठी काय केलं पाहिजे यावर अतिशय हलक्या फुलक्या शब्दात संवाद साधला याला विद्यार्थ्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तंदुरुस्ती, भावनिक आणि आध्यात्मिक तंदुरुस्ती कशा महत्वाच्या आहेत आणि यामुळेच आपण आनंदी कसे राहू शकतो हे त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीरूपेतून आणि उदहारणे देवून विद्यार्थ्याना समजावुन सांगितले. , मानसोपचारतज्ज्ञ , बरखा दिनानी यानी विद्यार्थ्या बरोबर विवीध प्रकारचे छोटे खेळ खेळता खेळता स्मरणशशक्ती विकास कसा करता येतो याविषयी टिप्स दिल्या , विविध प्रकारचे शारिरिक व्यायाम घेता घेता विद्यार्थ्यांना सांघिक कामाच महत्त्व पटवून दिले.संख्यां शास्त्रां बद्दल टिप्स दिल्या. इंग्रजी भाषा व्याकरणातील रंजक अश्या टिप्स देत इंग्रजी व्याकरणवर कस प्रभुत्व येईल व सफाईदार इंग्रजीत कस लिहीता,बोलता येईल यावर मार्गदर्शन केले. माजी अध्यक्षा डॉ. श्रीया कुलकर्णी ह्यानी शालेय जीवनात ध्येय ठेवून प्रयत्नांची परकाष्टा करीत ध्येय पूर्तीसाठी प्रयत्नशील राहावे. ,रोटे.प्रा.सोनाली चिंधडे यांनी 10 वी आणि 12 वी नंतर उपलब्ध असलेल्या विविध करिअर पर्यायांवर एक अतिशय मनोरंजक सत्र घेतले.शिक्षण धोरणातील बदलांबद्दल सांगितले, केवळ अभ्यासक्रमच नाही तर छोटे व्यवसाय, व्यवसायातील संधी, सरकारी विभागाच्या विविध वेबसाइट्स, जिथून अर्ज करता येईल याबद्दलही त्यानी सांगितले. हे एक अतिशय संवादात्मक सत्र होते कारण विद्यार्थ्यांनी खूप प्रश्न विचारत आपल्या शंकाच निरसन केले. रोटे. लीना बाकरे यांनी कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये काय संधी आहेत, परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये करिअर मध्ये काय संधी आहेत, नोकरीच्या संधी काय आहेत, कोणकोणत्या काॅलेजेसमध्ये हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत याची माहिती दिली.
रोटे.ॲड.राजेश्वरी बालाजीवाले , दिलीपसिंग बेनिवाल, डॉ गौरी कुलकर्णी यांनी विद्यार्थ्याना विविध विषयवार मार्गदर्शन केले.रोटे. स्मिता आपशंकर यांनी आपले हात स्वच्छ कसे धुवावेत यावर मार्गदर्शन केले.तेजल दीक्षित यानी रोटरी युथ एक्सचेंज कार्यक्रम बद्ल महिती दिली. बि.एल.व्हि.डि हाॅटेलचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. श्रीराम तिवारींनी हॉटेल इंडस्ट्री मधील व्यवसाय, नोकरीत असलेल्या संधी बद्दल माहिती दिली. ग्लोबल व्हिजन स्कूलच्या संचालिका विजयलक्ष्मी मणेरीकर व शिक्षकवृंदाची उपस्थिती होती.रोटे. कार्यक्रमासाठी मंथ लिडर रोटे. लिना बाकरे,साहेबराव राठोड, सचिव शिल्पा पारख, एक दिवस स्वप्नातला’ समिती प्रमुख उर्मी दिनानी, सुधीर जोशी,मोना सामनेरकर, सुचेता महादेवकर, वंदना संमनवार, दमयंती बरडिया यांनी परिश्रम घेतले.