इतर

नाशिक रोटरी क्लबचा १८ पुरस्कारांनी सन्मान

प्रफुल बरडीया बेस्ट प्रेसिडेंट, 

ओमप्रकाश रावत बेस्ट सेक्रेटरी

 तर संतोष साबळे यांना बेस्ट पब्लिक रिलेशन अवार्ड

नाशिक : गेली ७८ वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याऱ्या रोटरी क्लब ऑफ नाशिक या संस्थेचे मागील वर्षातील कार्यही विशेष वाखणण्याजोगे असेच ठरले. सीए प्रफुल बरडीया अध्यक्ष राहिलेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिक या क्लबचा डिस्ट्रिक्ट ३०३० च्या वार्षिक गौरव पुरस्कार सोहळ्यात रोटरी चौक, उज्वलदृष्टी अभियान, पिंक रिक्षा उपक्रमासह विविध क्षेत्रांत विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तब्बल १८ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. या समारंभात नाशिक रोटरीचे अध्यक्ष प्रफुल बरडीया यांना बेस्ट प्रेसिडेंट, ओमप्रकाश रावत यांचा बेस्ट सेक्रेटरी तर संतोष साबळे यांचा बेस्ट पब्लिक रिलेशन अवार्डने गौरव करण्यात आला.

रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३०३० चा वार्षिक ‘गौरव पुरस्कार’ सोहळा वर्धा येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. नाशिक ते नागपूर कार्यक्षेत्रातील सुमारे ११० क्लबने केलेल्या कार्याबद्दल वार्षिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनुवाला तसेच रोटरी इंटरनॅशनलचे माजी संचालक अशोक महाजन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. अतिशय रंगतदार आणि दिमाखदार कार्यक्रमात सीए प्रफुल बरडीया यांच्या २०२२- २३ या वर्षातील कामासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकने तब्बल १८ सन्मान पटकावले आहेत. त्यात विशेषतः रोटरी चौक, उज्वलदृष्टी अभियान, पिंक रिक्षा उपक्रमासह बेस्ट प्रेसिडेंटचा सन्मान सीए प्रफुल बरडीया, बेस्ट इंटरॅक्ट उपक्रम, नॉन मेडिकल, रक्तदान शिबीर, बेस्ट बुलेटीन – रोटरीनामा, बेस्ट पब्लिक रिलेशन – संतोष साबळे, बेस्ट सेक्रेटरी – ओमप्रकाश रावत, मेंबरशिप – अजय नरकेसरी, पब्लिक इमेज – डॉ. श्रीया कुलकर्णी, डिस्ट्रिक्ट चेअर – अदिती अग्रवाल, डिस्ट्रिक्ट सीएसआर चेअर – रवी महादेवकर, आरएमबी – सागर भदाणे, एजी – मुग्धा लेले तसेच सर्वाधिक हृदय शस्रक्रियासाठीचा सन्मानही प्रदान करण्यात आला.  

रोटरी संस्थेची प्रतिमा समाजात रुजविण्यासाठी संस्थेचे जनसंपर्क संचालक म्हणून जबाबदारी सांभाळणारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील अधिकारी संतोष साबळे यांनी विशेष सामाजिक भूमिका बजावली. गेल्या वर्षभरात संस्थेच्या विविध लोकाभिमुख उपक्रमांच्या सुमारे ४५० हून अधिक बातम्यांना विविध प्रसिद्धीमाध्यमांतून प्रसिद्धी दिली. श्री. साबळे यांनी केलेल्या कार्याची दखल रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० ने घेत बेस्ट पब्लिक रिलेशनसाठीचा सन्मान केला. मुक्त विद्यापीठाच्या सहकार्याने विद्यापीठात आदिवासी भागातील मुलांचे नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी दरवर्षी ‘रायला’ महोत्सव आयोजित केला जातो.

रोटरीचे विद्यमान अध्यक्ष सीए प्रफुल बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास नाशिक शहरातील अनेक मान्यवर तसेच रोटरीचे पदाधिकारी आणि सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल प्रफुल बरडिया आणि नाशिक रोटरी क्लबचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान प्रफुल बरडीया यांना बेस्ट प्रेसिडेंट अवार्डने केलेल्या सन्मानाचे श्रेय रोटरीचे सर्व सदस्य, संचालक आणि माजी पदाधिकाऱ्यांना दिले आहे. यासार्वांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button