राजापूर महाविद्यालयात ग्रीन क्लब ची स्थापना…..

संगमनेर प्रतिनिधी
प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालय दिनांक 14ऑगस्ट 2023 रोजी ग्रीन क्लब ची स्थापना करण्यात आली.याप्रसंगी प्रागतिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिल गोडसे उपाध्यक्ष आर पी हासे,सेक्रेटरी ॲड.कैलास हासे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचर्य डॉ सुभाष कडलग यांनी केले.महाविद्यालयात विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबविले पाहिजे तसेच वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे असे सूचक मत मांडले.याप्रसंगी वृक्ष फाऊंडेशन राजापूर येथील भाऊसाहेब हासे, जिजाबा हासे ,योगेश हासे ,उपस्थित होते .त्यांनी वृक्ष लागवड आणि संवर्धन यावर सुंदर मार्गदर्शन केले तसेच प्रत्यक्षात महाविद्यालय परिसरात नारळ लागवड देखील केली.अध्यक्षीय मनोगतात ॲड.कैलास हासे यांनी असे उपक्रम हे कृतिशील असावे असे सूचक मत व्यक्त केले.याप्रसंगी शैक्षणिक वर्ष 2023-24 मधे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना त्यामधे प्रामुख्याने राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यार्थी विकास मंडळ याचे उद्घाटनही करण्यात आले. ग्रीन क्लब समन्वयक प्रा.सुभाष वर्पे यांनी विस्तृतपणे ग्रीन क्लब विषयी विद्यार्थ्यांना मार्गर्शन केले.तसेच प्रा.रवींद्र गोफने यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विदयार्थी विकास मंडळ अधिकारी डॉ.प्रवीण आहेर यांनी कमवा आणि शिका ही योजना विद्यार्थ्यांमध्ये स्वयं रोजगार व शिक्षणासाठी कशी मदत करते याची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .शीतल वाळुंज यांनी केले. तर आभार प्रा.भालेराव यांनी मानले. महाविद्यालयातील सर्वच प्राध्यापक ,नॉन टीचींग व सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदविला.