वडगाव सावताळ येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

ग्रामीण भागात अनेक प्रतिभावान खेळाडू : भाऊसाहेब शिंदे
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यातील ग्रामीण भागातील वडगाव सावताळ येथे गाजदीपूर वडगाव सावताळ चॅम्पियन प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे स्थानिक गाव पातळीवर आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते वडगाव सावताळचे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
स्थानिक पातळीवर आयोजित करण्यात आलेले या स्पर्धेमध्ये विविध बक्षिसे खेळाडूंना देण्यात येणार आहे तसेच विजयी संघाला ट्रॉफी व रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी खऱ्या अर्थाने वडगाव सावताळ सारख्या ग्रामीण भागामध्ये या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भाऊसाहेब शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी केले आहे.
यावेळी शिंदे म्हणाले क्रिकेट हा जागतिक स्तरावरील एक महत्त्वपूर्ण खेळ आहे या खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना आपले कौशल्य दाखवता येते. महाराष्ट्राने या देशाला व जगाला अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू दिले आहेत. ग्रामीण भागामधूनही मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळाडू हे देश स्तरावर खेळत असतात. आयपीएल सारख्या स्पर्धांच्या माध्यमातून क्रिकेट सारख्या क्षेत्रात अतिशय स्पर्धा वाढली आहे. क्रिकेट हा खऱ्या अर्थाने स्पर्धेचा खेळ आहे. पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत परंतु त्यांना योग्य ते व्यासपीठ उपलब्ध होत नाही. स्थानिक पातळीवर क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे ही स्पर्धा भरवण्यामागचा उद्देश आहे.
यावेळी खंडू शिंदे, सागर करगळ, जय बर्डे, बाळू झावरे, दादाभाऊ नऱ्हे, गणेश रोकडे, राधु सातकर, नबूबाबा पवार, गोटू खामकर, संदीप पवार, विठ्ठल बर्डे, विशाल पवार, सत्यवान शिंदे, सुदाम पवार, आदी खेळाडू मान्यवर गाजदीपुर वडगाव सावताळ भागातील क्रिकेट रसिक ग्रामस्थ उपस्थित होते.