तंत्रज्ञान
चंद्रयान यानाचे चंद्रा वर यशस्वीपणे लँडीग भारतीय मजदूर संघाकडून स्वागत

पुणे-आज 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर पोहचणारा पहिला देश ठरला आहे. हा सर्व भारतीयांना अत्यंत अभिमानास्पद क्षण ठरला आहे. याचे भारतीय मजदूर संघाने स्वागत केले आहे
या बद्दल सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, प्रकल्पातील कामगार, कंत्राटी कामगार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या कार्याला
भारतीय मजदूर संघाने शुभेच्या देत अभिनंदन, केले या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा कार्यालयात मोठा जल्लोष करण्यात आला. या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा कार्यालयात अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपाध्यक्ष अण्णा महाजन, श्रीमती बेबी राणी डे व ईतर पदाधिकारी उपस्थित होते.