पिक विमा मंजूरीसाठी ई,पीक पाहणीची अट शिथिल करा – बाळासाहेब जाधव

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव, भातकुडगाव, एरंडगाव या तीन मंडळामध्ये २५ टक्के पिक विमा रक्कम मंजूर होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. मात्र पिक विमा मंजूर करताना ई,पीक पाहणी करणे शेतकऱ्यांना शासनाकडून बंधनकारक केले आहे मात्र सर्व शेतक-यांना काही स्थानिक व तांत्रिक अडचणीमुळे ई-पीक पाहणी करणे शक्य नसल्याने शासनाने पिक विमा मंजूर करताना ई,पीक पाहणीची अट शिथिल करावी. अशी मागणी शेवगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक तथा माजी आ. घुले बंधूचे खंद्दे समर्थक बाळासाहेब जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.
प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाने शेतकरी बांधवांसाठी एक रुपयात पिक विमा योजना आणली . अनेक शेतकऱ्यांनी एक रुपयांत खरीप पिकांचा पिक विमा उतरविला. सध्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने खरिप पिकांचे अतिशय नुकसान झाले आहे. शासनाने पिक विमा मंजूरीमध्ये कापूस, मुग भुईमूग ,बाजरी, तूर या पिकांचा समावेश केला आहे.पिक विमा मंजूर व्हावे अशी मागणी जोर धरत असताना २१ दिवसाचा पावसाचा खंड पडल्याने विम्याच्या २५ टक्के रक्कम मिळणार आहे.
शासनाकडून नुकसान सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या मंडळामध्ये २५ टक्के पिक विमा मंजूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करताना ई, पिक पाहणी आवश्यक असल्याचे सांगितले जाते. शेतकऱ्यांना ई, पीक पाहणी करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. शेतकरी वर्ग सुशिक्षीत नसल्याने पिक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ई,पाहणीची अट रद्द करुन पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अशी मागणी बाळासाहेब जाधव यांच्यासह जेष्ठ कार्यकर्ते, ज्ञानेश्वर संचालक शिवाजीराव गवळी, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गणेश खंबरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष तथा संचालक अँड. अनिल मडके, अशोक मेरड, देवटाकळी सरपंच ज्ञानदेव खरड, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, मजलेशहरचे जेष्ठ कार्यकर्ते विक्रम लोढे, सरपंच अशोकराव लोढे, मठाचीवाडी चे सरपंच सतीश धोंडे, भातकुडगाव चे सरपंच अशोकराव वाघमोडे, उपसरपंच विठ्ठल फटागरे, दुध संघाचे संचालक राजेश फटांगरे, आखतवाडे सरपंच रघुवीर उगले, जोहरापूरचे माजी सरपंच अशोकराव देवढे, हिंगणगांवचे संदिप बामदळे, सतीष पवार, संजय पवार, आदीनाथ खरड, भाऊसाहेब सामृत, भातकुडगाव सोसायटी चेअरमन सचिन फटांगरे, जलभूमी फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष मुकुंद जमधडे, अमोल वडणे,अनिल भेंडेकर, आप्पासाहेब फटांगरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.
इतर मंडळाचा समावेश करा – फटांगरे
सध्या दुष्काळी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एक रुपयामध्ये विमा भरणाऱ्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव, बोधेगाव, एरंडगाव मंडळातील शेतकऱ्यांना विमा भरलेल्या श्रेत्राच्या २५ टक्के रक्कम नुकसान भरपाई मिळणार आहे. मात्र तालुक्यातील फक्त तीनच मंडळाचा समावेश होत असल्याने तालुक्यातील इतर मंडळातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याने तालुक्यातील सर्वच मंडळाचा समावेश व्हावा. अन्यथा कृषी अधिका-याला घेराव घालून कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
राजेश फटांगरे –
माजी सरपंच, भातकुडगाव