दुसऱ्या श्रावण शनिवार निमित्त शनिशिंगणापुरात शनि भक्तांची मंदियाळी!

सुप्रीमचे न्यायमुर्ती कौल यांनी घेतले शनिदर्शन
राजूर ते शनिशिंगनापुर पायी कावड़
कळब ते शनिशिंगनापुर पायी दिंडी चे शनिदर्शन!
विजय खंडागळे
सोनई ता नेवासा
श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवार पासूनच पहाटे 4 वाजल्या पासून परिसरातून, तालुक्यातील भाविक पायी येऊन चौथारा शनि दर्शन, जलभिषेक करुन ओल्या वस्राने शनिदर्शन घेतले.
सर्वोच्च न्यायालयचे न्यायमुर्ती संजय कौल यानीही तेल अभिषेक करत शनिदर्शन घेतले.सोबत तहसीलदार संजय बिरादार, तसेच नगर -नेवासा न्यायालयचे न्यायधीश उपस्थित होते.
सालाबाद प्रमाणे स्व. बालाजी चौथवे यांच्या प्रेरनेने एकमेव तेल कावड़ राजूर ते शनिशिंगनापुर पायी कावड़ 51 शनिभक्त सामील होऊन अखाडितपणे 15वर्ष पूर्ण करून तेल अभिषेक शनिदेवाच्या घोषणा देऊन पूजा करण्यात आली.नामदेव घाटकर, गोरख कार्डिंले, हीरामन घाटकर, राजू चौथवे, आप्पा बनसोडे, मधुकर पाबळकर, शिवाजी पाबाळकर, आदिनी प्रबोधन जनजागृति केली.
धाराशिव जिल्ह्यातील कळब ते शनिशिंगनापुर पायी दिंडी ही 150 शनिभक्तसह दाखल होऊन ह. भ. प. विठ्ठल महाराज सुड़के यांच्या मुख्य मार्गदर्शनखाली काल 9 वर्ष अखंडित पणे पूर्ण केले.

दुसऱ्या शनिवारही नेहमीची गर्दी, व परिसरातील गर्दी एकच झाल्याने दिवसभर भविकांची गर्दिच गर्दी होती.शनिदेवला श्रावण महिन्यात जलभिषेक करण्याची परपरा असल्याने भाविकांनी स्नान करुन दर्शन घेतले.
साईं ग्रूपच्या वतीने सतीश लिपाने, बाळासाहेब शेलार, संतोष खोसे, सचिन निमसे, सुनील चादने, दादा दरदले, रावसाहेब वैराग़र, सोमनाथ लांडे, दिपक वैराग़र, सुनील कदम, नितिन खोसे आदींनी ठीकठिकाणी भाविकाना प्रसादचे वाटप करत होते.

देवस्थान प्रशाशनच्या वतीने अध्यक्ष भागवत बानकर, विश्वस्त दिपक दरंदले, पत्रकार विजय खंडागळे, पोलिस पाटील सयाराम बानकर यांनी अतिथींचे स्वागत केले.
यावेळी शनिशिंगनापुर ठाण्याचे श्री. रामचंद्र करपे व सोनईचे स. पो. नि. माणिक चोधरी यांच्या पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.