देवटाकळी येथील लिटल स्टार इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील अल्पावधीतच नावा रुपाला आलेल्या लिटल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन शिवजयंती कार्यक्रममोठ्या उत्साहात संपन्न झाला.सांज चिमणपाखरांची या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या आकर्षक देखाव्याचे परिसरातून स्वागत झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन सायकल क्लब शेवगाव टिमच्या हस्ते महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवराय व गणरायाची आराधना करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.शाळेतील चिमूरड्यांनी बहारदार नृत्य करून शेतकरी, मनोरंजन, हास्यविनोद, शिक्षण, कला अशा विविध विषयाशी सुसंगत साधत कार्यक्रमात रंग भरला. या कार्यक्रमाचे परिसरातील उपस्थित सर्वांनी कौतुक केले. यावेळी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेकडून स्टुडन्ट ऑफ द इयर चे बक्षीस देण्यात आले छोट्या गटात कु. आस्था गणेश गवळी (प्रथम क्रमांक ) चि. यश गणेश कावले (द्वितीय क्रमांक )
मोठ्या गटात
कु.ओवी सचिन मडके (प्रथम क्रमांक )
कु. वैष्णवी बाबासाहेब साबळे (द्वितीय क्रमांक )
चि.विराज पुरुषोत्तम फटांगरे (तृतीय क्रमांक ) या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी देवटाकळी चे सरपंच सौ.अनिता खरड उपसरपंच सौ.उज्वलाताई मेरड,माजी सरपंच श्रीराम खरड संभाजी गवळी, ज्ञानदेव खरड,माऊली निमसे,अमोल पानकर, सौ. सुप्रिया साबळे, सौ अर्चना काळे, सौ. संध्या वाघमारे, कु. प्रणिता कोल्हे, सौ. प्रिया लद्दे सौ. सुनीता आंधळे, भारती साबळे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र पानकर, शहाराम आगळे, शिवाजी खरड यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबासाहेब साबळे यांनी केले. तर आभार योगेश साबळे यांना मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण काळे यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान दिशा ऍग्रो इंडस्ट्रीज भायगावचे प्रल्हाद पालवे यांच्याकडून एक संगणक प्रदीप मडके यांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शाळेस ५००० रु किमतीचे चार सिलिंग फॅन भेट म्हणून दिले.