उद्योजक दीपक देशमुख यांचे कडून कोतुळेश्वर चरणी ८ लाखाचा एल. ई.डी.स्क्रीन !

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे मुळा नदीकाठावर असणारे जागृत देवस्थान श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान ला शासनाने ब वर्ग दर्जा दिला आहे लोकवर्गणी आणि भाविकांच्या देणगीतून मंदिर परिसराचे सुशोभीकरण होत आहे दर श्रावण सोमवारी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे

कोतुळेश्वर मंदिर परिसर विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे मंदिर परिसरातील विकास कामे वेगाने मार्गी लागत असल्याने मंदिर परिसर निसर्ग रम्य होत आहे
कोतुळेश्वर मंदिर देवस्थान साठी पुण्यातील उद्योजक दिपक किसनराव देशमुख यांनी कै. रावसाहेब आप्पाजी देशमुख, कै. कुंडलिक आप्पाजी देशमुख, कै. सरखाहरी आप्पाजी देशमुख, कै. किसनराव आप्पाजी देशमुख यांच्या स्मरणार्थ र्देवस्थान साठी आठ लाख रुपये किमतीचा १२ बाय ८ ची एल.ई.डी. स्क्रीन श्री कोतुळेश्वर चरणी अर्पण केला आहे या वस्तुचे दान करणारे उद्योजक .
सौ. अनिता व श्री. दिपक किसनराव देशमुख यांचा श्री कोतुळेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ कोतूळ यांचे वतीने सत्कार केला