आजचे पंचांग व राशिभविष्य दि.८/०९/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १७ शके १९४५
दिनांक :- ०८/०९/२०२३,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३७,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- निज श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति १७:३१,
नक्षत्र :- मृग समाप्ति १२:१०,
योग :- सिद्धि समाप्ति २२:०७,
करण :- वणिज समाप्ति ३०:२१,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पूर्वा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कर्क,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५४ ते १२:२७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२२ पर्यंत,
समृत मुहूर्त — सकाळी ०९:२२ ते १०:५४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:२७ ते ०१:५९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
घबाड १७:३१ नं., भद्रा ३०:२१ नं.
————–
: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १७ शके १९४५
दिनांक = ०८/०९/२०२३
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळे महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणे जमणार नसल्याने आज कोणताही निर्णय न घेणे हितावह राहील. कामा निमित्त किंवा काही कारणास्तव प्रवास करावा लागेल. लेखनकार्य करण्यास दिवस अनुकूल आहे. बौद्धिक व तार्किक विचार विनिमय होईल. कोणत्याही स्त्रीशी वाद घालू नका.
वृषभ
आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज चंचल मनःस्थितीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल. समजूतदारपणा दाखविल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. लेखक, कलाकार तथा सल्लागार ह्यांच्यासाठी दिवस अनुकूल आहे. नवे काम आरंभ करण्यात अडचणी येतील.
मिथुन
आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. स्वादिष्ट व रूचकर भोजनाचा आस्वाद घेऊन, वस्त्रालंकार मिळवून तसेच मित्र व कुटुंबीय यांच्या सहवासामुळे मानसिक दृष्टया दिवस अत्यंत आनंददायी ठरेल. प्रकृती उत्तम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. नकारात्मक विचार मनात येऊ न देणे हितावह राहील.
कर्क
आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. संबंधित व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्रापंचिक कार्यावर खर्च होईल. वाणी वर संयम ठेवावा लागेल. मनातील साशंकता दूर करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
सिंह
आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. स्त्रीया व मित्रवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. रम्य स्थळी प्रवासाला जाल. निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळे हाती आलेली संधी गमावून बसाल म्हणून महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे हितावह राहील. विचार करण्यात खूप वेळ जाईल. आर्थिक लाभ संभवतात.
कन्या
आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी व नोकरदारांसाठी दिवस अनुकूल आहे. व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ संभवतात. घरात आनंदी वातावरण राहील.
तूळ
आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी व व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. लेखनकार्य व बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल. परदेशातून मित्र व नातलगांकडून आनंददायी बातमी मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य राहील.
वृश्चिक
आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस शांततेत व सावधानतेत घालवावा लागेल. नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता असल्याने आज नवीन कामे सुरू न करणे हितावह राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. सरकार विरोधी प्रवृतीं पासून दूर राहणे हितावह राहील. खर्च वाढल्याने आर्थिक संकटाची सुद्धा शक्यता आहे.
धनु
आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांसह एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल. लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भागीदारीतून फायदा होईल.
मकर
आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार – व्यवसायास अनुकूल आहे. व्यापार वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार यशस्वीपणे होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. योग्य ठिकाणीच पैसा खर्च होईल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यापार्यांना कायदेशीर त्रास संभवतो. परदेशाशी व्यापार वाढेल. शत्रूवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ
आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील. विचारात सतत बदल होत असल्याचे दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. संतती विषयी काळजी राहील. लेखन व नवनिर्माण ह्या कामासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. अचानक खर्च उदभवतील. पोटाचे विकार संभवतात.
मीन
आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस मना विरुद्ध गोष्टी घडण्याचा आहे. त्यामुळे आपला उत्साह मावळेल. कुटुंबात वाद संभवतात. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. स्वास्थ्य बिघडल्याने झोप लागणार नाही. स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. पैसा व कीर्ती ह्यांची हानी संभवते. नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादींशी संबंधित दस्तावेजात काळजी घ्यावी.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर