इतर

मुळा पाटबंधारे विभागाच्या टेलच्या भागातील पाणी वापर संस्थांनी जागृत रहा- चंद्रशेखर घुले

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी

मुळा पाटबंधारे लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थेना बळकटी देऊन शासनाने संस्थांना अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी तत्परता दाखवली पाहिजे. त्यासाठी मुळा धरणाच्या टेलच्या भागातील पाणी वापर संस्थांनी जागृत राहून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे असे मत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा चौफुल्यावरील वरदराज लॉन्स मध्ये आयोजित शेतकरी पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांच्या बैठकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले बोलत होते.

यावेळी त्यांच्या हस्ते नूतन पदाधिकार्यांचा गुणगौरव करण्यात आला. टेलच्या भागातील शेतकऱ्यांना मुळा धरणाच्या पाण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो.प्रत्येक आवर्तन टेल टू हेड राबवल्यास शेतकऱ्यांना संघर्षाची वेळ येणार नाही. यासाठी अधिकाऱ्यांनी शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून तत्परता दाखवली पाहिजे असे मत त्यांनी मांडले.

यावेळी विचार मंचावर लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती जेष्ठ नेते दिलीपराव लांडे, जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे संजयजी कोळगे, शिवाजीराव गवळी अंबादास कळमकर,बबनराव भुसारी, पवनकुमार साळवे, अमरापूर उपविभागीय अभियंता स्वप्नील देशमुख, चिलेखनवाडी उपविभागीय अभियंता संदीप पवार, शाखा अधिकारी सुधीर चव्हाण, बिरबल दरवडे उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबूलाल पटेल, कृषी उत्पन्नचे माजी सभापती अँड. अनिलराव मडके,कृषी उत्पन्नचे उपसभापती गणेशजी खंबरे,नूतन संचालक अशोकराव मेरड, राहुल बेडके, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष सचिन फटांगरे, जोहरापुरचे माजी सरपंच अशोकराव देवडे, सखाराम लव्हाळे, भातकुडगावचे सरपंच अशोकराव वाघमोडे, उपसरपंच विठ्ठलराव फटांगरे, शेतकरी बचाव जन आंदोलनाचे एकनाथ काळे, शिवसंग्राम पक्षाचे जिल्हा सरचिटणीस संदीपराव बामदळे, सतीष पवार, संजय पवार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भायगाव ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र आढाव यांनी केले तर शिवाजी गवळी यांनी आभार मानले. सूत्रसंचालन खरेदी विक्री संघाचे संचालक जलभूमी परिवाराचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब जाधव यांनी केले.


मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडचणीतील टेलच्या भागातील पाणी वापर संस्थांना बळकटी देणे गरजेचे आहे. अवैध रित्या होत असलेली पाण्याची चोरी रोखली तर टेलच्या भागाला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल.व टेलच्या भागातील पाणी वापर संस्था अडचणीत येणार नाहीत.
राजेंद्र आढाव पाटील
सरपंच ग्रामपंचायत भायगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button