इतर

पिंपळगाव खांड धरणातील पाणी पळवण्याचा प्रयत्न हाणून पाडू -सीताराम पाटील देशमुख

कोतूळ प्रतिनिधी

पिंपळगाव खांड धरणातून संगमनेर तालुक्यात पाणी पळविण्याचा प्रयत्न हाणून पाडू असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख यांनी दिला आहे
मागच्या लोकप्रतिनिधीने पठार भागाला पाणी दिले नाही असा आरोप आमदार डॉ
. किरण लहामटे यांनी केला आहे यावरमुळा विभागातील ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सिताराम पाटील देशमुख यांनी आमदार लहामटे यांचा आरोप चुकीचा असल्याचे म्हटले आहे आमदार लहामटे यांनी आयत्या पिठावर रेघा ओढू नये असे श्री देशमुख यांनी म्हटले आहे

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी चाळीस वर्षात मुळा बारामाही करण्याचा प्रयत्न केला पिचड यांनी मुळा भागात आंबित ,बलठण, कोथळे ,शिरपुंजे घोटी शिळवंडी असे बंधारे निर्माण केले व खडकी पासून ते संगमनेर तालुक्यातील आभाळवाडी पर्यंत शिसवद ,घोटी, मॅचकरवाडी ,वांजुळशेत, खडकी, पैठण, आंभोळ धामणगाव पाट, वाघापूर ,लहित ,चास पिंपळदरी , कोठे बोरबन घारगाव ,आभाळवाडी अशा अनेक कोल्हापूर बंधाऱ्यांची मालिका उभी केली आणि मुळा भागाचा पाणी प्रश्न सोडवला. आंबित धरणाच्या माध्यमातून साकुर आभाळवाडी पर्यंत पाणी देण्याचे नियोजन केले हे पाणी कमी पडत असताना पिंपळगाव खांड धरणाची निर्मिती केली आणि पिंपळगाव खांड च्या माध्यमातून पठार भागा पर्यंत मुळा नदी जिवंत ठेवण्याचे काम केले असे असताना देखील पिचड यांनी पठाराला पाणी दिली नाही असा आरोप करणाऱ्या आमदार लहामटे यांचेवर सिताराम देशमुख यांनी कडक शब्दात टीका केली लहामटे आगामी2024 च्या निवडणूका लक्ष करून पठार भागाला पाणी योजना करत आहेत याचे स्वागत आहे परंतु त्यांनी आयत्या पिठावर रेघा ओढू नये मुळा नदीवर अनेक साईट आहे मतदार संघातील संगमनेर तालुक्यातील पठार भागासाठी त्यांनी पिंपळगाव खांड धरणाच्या खाली साठा बंधारे निर्माण करून त्यातून संगमनेर पठार भागातील जनतेला जरूर पाणी द्या परंतु पिंपळगाव खांड धरणामध्ये त्या योजनेचा फुटबॉल टेकु देणार नाही प्रशासनाने तसा प्रयत्न केल्यास पिंपळगाव खांड धरण लाभ क्षेत्रातील शेतकरी कदापि सहन करणार नाही मूळ नदीवर आणखी एक ते दोन टीएमसी पाणी अडविण्या ची आवश्यकता आहे त्यासाठी आमदार लहामटे यांनी आपली ताकद पणाला लावावी त्यासाठी आम्ही सहकार्य करू असे सांगत
अकोले तालुक्यातील कळंब मन्याले ब्राह्मणवाडा योजनांसाठी देखील पिंपळगाव खांड धरणाच्या खाली स्वतंत्र साठा बंधारा तयार करून यातून पाणी उचलावे मुळा नदीत पाणी उपलब्ध करा मग तुम्ही पठारा भागाला पाणी द्या आदरणीय पिचड यांनी चाळीस वर्षात मुळा नदी जिवंत करण्याचे काम केले पिचड यांच्या अथक प्रयत्नातून झालेल्या मुळा बांधणीचे काम शेतकरी कधीही विसरणार नाही मात्र पिचड यांनी उपलब्ध केलेले पाणी पळवण्याचे काम लहामटे यांनी करू नये तसा प्रयत्न केल्यास मुळा परिसरातील जनता शेतकरी कधीही स्वस्त बसणार नाही याबाबत पिंपळगाव खांड धरण पाणी बचाव कृती समिती लवकरच आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे श्री सीताराम पाटील देशमुख यांनी सांगितले

पिंपळगाव खांड धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे कर्ज घेऊन पाईप लाईन करून शेती उभी केली केले आहेत जमिनी डेव्हलप केल्या मोठी गुंतवणूक करून शेतकरी कर्जबाजारी झाले आहे शेतकऱ्यांच्या बोकांडी या शेतीचे कर्ज आहे कर्ज अद्यापही फिटले नाही पिंपळगाव खांड च्या पाण्याच्या भरोशावर शेतात आज पिके उभे आहेत तेच पाणी पळवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे पाणी योजनेच्या नावाखाली पिंपळगाव खांड धरणातील पाणी पळ विले गेल्यास भविष्यातील धरण लाभक्षेत्रातील शेतकरी पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यापासून वंचित राहू शकतात दूध, शेती ,भाजीपाला पिके उध्वस्त होतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील भेडसावू शकतो अशा प्रकारचा यक्ष प्रश्न पुढे असताना देखील पिंपळगाव खांड धरणातून पठार भागाला जाणाऱ्या पाणी योजनेसाठी पाणी दिल्यास त्याचे गंभीर परिणाम लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना सहन करावे लागतील हे पाप आमदारांनी करू नये पठार भागाला पाणी देण्याचा आमचा विरोध नाही पण आमदारांनी पठार भागासाठी स्वतंत्र साठे बंधारे निर्माण करावे आणि त्यातून पठार भागाला पाणी द्यावे पिंपळगाव खांड धरणातून पाणी नेन्याचा प्रयत्न प्रशासनाने केल्यास पाणी योजनेच्या चरत उड्या घेऊन काम बंद पाडू न जन आंदोलन उभारू असा इशारा पिंपळगाव खांड पाणी बचाव कृती समितीचे वतीने श्री सिताराम देशमुख यांनी दिला आहे
पिंपळगाव धरण कार्यक्षेत्रातील लिंगदेव, बोरी, लहित पिंपळदरी या गावांच्या पाणी योजना अद्याप कार्यान्वित झाल्या नाही या योजनांनाच पाणी देणे आवश्यक असताना कार्यक्षेत्राबाहेरील योजनांचा पाणी उचलण्याचा घाट घातला जात आहे तो कदापि सहन केला जाणार नाही असेही देशमुख यांनी म्हटले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button