इतर

अकोल्यातील माणिकओझर येथील घरफोडीतील आरोपीला केले गजाआड ….

गुन्ह्यातील दागीने हस्तगत , राजुर पोलिसांची कामगिरी .

विलास तुपे

राजूर/प्रतिनिधी

वरिष्ठांचे सुचना व आदेशा प्रमाणे राजुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे व पोलीस कॉन्टेबल अशोक गाढे हे दि. 11/09/2023 रोजी 23.00 वा. ते दि. 12/09/2023 रोजी 05.00 वा. दरम्यान संगमनेर उपविभागात रात्रगस्त करीत असताना दि. 12/09/2023 रोजी रात्री 01.20 वा. चे सुमारास कोल्हार घोटी रोडवर राजुर ता. अकोले जि. अहमदनगर येथे पोहचले असता एक इसम अंधारात त्याचे अस्तीत्व लपवुन वावरताना दिसला असता त्यास पकडुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अनिल भिमा मडके रा. गर्दणी ता. अकोले जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतले.

त्याचेकडे अपरात्री फिरण्याचे कारण विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत घरफोडी करण्या करीता आवश्यक असनारी एक लोखंडी पक्कड तिच्या मुठांना लाल रंगाचे प्लास्टीकचे आवरण असलेली अशी मिळुन आल्याने त्या बाबत पंचनामा करुन सदर इसमास पोलीस स्टेशनला आणुन पो. कॉ. अशोक गाढे यांचे फिर्यादी वरुन राजुर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 317/2023 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे दाखल करण्यात आला.
नमुद गुन्ह्यातील आरोपीकडे राजुर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचे अनुशंगाने विचारपुस केली असता आरोपीने उडवा उडवीची उत्तरे देवुन गुन्ह्याचे तपासात सहकार्य करण्यास टाळाटाळ केली. परंतु आरोपी हा रात्रीच्या वेळी कोणतातरी गंभिर गुन्हा करुन आला असावा किंवा करण्याचे तयारीने आलेला असावा असा दाट संशय असल्याने आरोपीकडे सखोल तपास करीत असतानाच तक्रारदार महिला नामे जानकाबाई जिजाबा जंगले वय-80 वर्षे रा. मानिकओझर ता. अकोले जि. अहमदनगर यांनी समक्ष पोलीस स्टेशनला येवून कळविले की, दि. 11/09/2023 रोजी रात्री 11.30 वा. चे सुमा. ते त्यांचे पतीसह त्यांचे मुलाकडे गप्पा मारण्याकरीता गेले होते. त्या वेळी कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे घराची कडी उघडुन घरात प्रवेश करुन त्यांचे रोख रक्कम व सोन्या चांदिचे दागीने व कागदपत्र असा एखुन 53,000/- किंमतीचा ऐवज ठेवुन कुलुप लावलेली पत्र्याची पेटी ही चोरुन नेली आहे.

तक्रारदार महिला यांनी राजुर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या वरिल प्रमाणे तक्रारी वरुन गुन्हा रजिस्टर नं. 318/2023 भा.द.वी. का.क. 457,380 प्रमाणे दाखल करण्यात आला. आरोपी अनिल भिमा मडके याचेकडे नुमुद घरफोडी चोरीच्या गुन्ह्याचे अनुशंगाने सखोल तपास केला


असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथिदार नामे भागाजी यशवंता जंगले वय-32 वर्षे रा. माणिकओझर ता. अकोले जि. अहमदनगर याचे मदतीने केला असल्याचे सांगुन नमुद गुन्ह्यात चोरी केलेले सर्व सोन्या चांदिचे दागीने पंचांसमक्ष काढुन दिल्याने ते गुन्ह्याचे तपासकामी जप्त केले आहेत.
सदरची कारवाई श्री. राकेश ओला . पोलीस अधिक्षक अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मँडम, अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व . श्री. सोमनाथ वाघचौरे , उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस स्टेशनचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे व अंमलदार- पो.हे.कॉ. कैलास नेहे, पो.हे.कॉ बारकु गोंधे, म.पो.ना. रोहिणी वाडेकर, पो.कॉ. विजय फटांगरे, पो.कॉ. अशोक गाढे, म.पो.कॉ. उषा मुठे, पो.कॉ अशोक काळे चालक पो.कॉ. राकेश मुळाणे यांनी केली
ن

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button