शेवगाव तालुक्यातील या ९ गावचे शेतकऱ्यांची नाशिक च्या गंगाघाटावर महाआरती!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
ताजनापूर टप्पा १ या सुधारित योजनेतील वरूर आखेगाव सह ९ गावातील शेतकऱ्यांनी काल नाशिक येथे गोदावरी घाटावर जाऊन पूजा व महाआरती करून गंगेलाच आमच्या बंधाऱ्यात ये,तलावात ये असे साकडे घातले.
काल आखेगाव वरूर खु, वरूर बु,मुर्शदपूर,खरडगाव, सालवडगाव,हसनापुर,थाटे,वाडगाव येथील सुमारे १०० शेतकऱ्यांनी एस.टी बस भाड्याने घेऊन जि.प.सदस्या सौ.हर्षदा काकडे अॅड.डॉ.शिवाजीराव काकडे यांना आग्रह करून थेट नाशिक येथील गोदावरी घाट गाठले व तेथे अनोख्या पद्धतीने गोंधळ घालून गंगेची महाआरती या दाम्पत्याच्या हस्ते करून गंगेलाच आमचे ९ गावातील बंधाऱ्या तलावात ये असे साकडे घातले.सौ.हर्षदा काकडे यांनी गंगेला साडी,चोळी अर्पण करून गंगामाईची ओटी भरली.
यावेळी भगवान डावरे,मधुकर वावरे,गोरक्ष वावरे,जयवंत काकडे,नवनाथ ढाकणे,भाऊसाहेब बोडखे,गोरक्ष भोसले,श्रीधर उर्फ गणेश धावणे, रंगनाथ ढाकणे, अक्षय केदार,महादेव केदार,अशोक शिरसाठ,एकनाथ ढाकणे,वीर भाऊसाहेब,श्रीधर म्हस्के,सुरेशराव वावरे,शिवाजी धावणे,शेषराव टेकाळे,नामदेव ढाकणे,अर्जुन खंडागळे,भगवान गोरडे,शिवाजी कणसे,पप्पू गायकवाड,बाबासाहेब लांडे,विनायक काटे,मच्छिंद्र गोरडे,नामदेव सुपेकर,सुनील जवरे,सौ.सुलोचना मराठे,सरिता पुरणाळे,सुमनताई लांडे,सुमनताई गिरमकर,मंगलताई टेकाळे,रुक्मिणी भापकर,ज्ञानेश्वर गोंधळी व त्यांचे सहकारी इत्यादी अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी ६ वाजता शेवगाव येथून मोठ्या उत्साहात,भजने,गाणे म्हणत एस.टी मध्ये व काही खाजगी गाड्याने प्रवास करून व बरोबर शिदोरी घेऊन सर्व ९ गावातील शेतकऱ्यांनी काल ही अनोखी व मनःपूर्वक अशी गंगा आरती केली.
तसेच सौ.हर्षदा काकडे यांचे नेतृत्वाखाली नाशिक येथील मा.मुख्य अभियंता जलसंपदा विभाग,उत्तर महाराष्ट्र प्रदेश मा.श्री. प्रकाश मिसाळ साहेब यांना लेखी निवेदन देऊन व त्यांची भेट घेऊन वरील ९ गावांची जलसिंचन योजना सुधारित ताजनापूर टप्पा १ त्वरित पूर्ण करण्याबाबत साकडे घातले. त्याचवेळी मंगरूळ खु, मंगरूळ बु,कोळगाव, खु, अंतरवाली बु,बेलगाव येथील पाझर तलाव,बंधारे ताजनापूर लिफ्ट योजनेतून भरून द्यावेत असे लेखी निवेदन दिले.
यावेळी सौ.काकडे म्हणाल्या की, वरूर आखेगाव सह ९ गावातील शेतकरी मला व अॅड.डॉ.काकडे साहेबांना घेऊन आले व आमच्या हाताने गंगेची महाआरती केली व गंगेला साकडे घातले की आमचे गावातील बंधारे,तलाव गंगामाई आता तूच भरून दे,आमच्या अंगणात तुझे तूच ये.खरोखरच खूप भावनिक श्रद्धेने व भावनिक होऊन ९ गावातील शेतकऱ्यांनी ही मागणी गंगा मातेला केली.तसेच श्री. मा.मुख्य अभियंता मिसाळ साहेब यांनीही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद आमच्या मागणीला दिलेला आहे. वरील ९ गावांसाठी हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा असून आतापर्यंत या प्रश्नाकडे शासन स्तरावर,नेतृत्व स्तरावर गांभीर्याने न पाहिले गेल्यामुळे शेतकऱ्यांची उपेक्षा व हेळसांड झालेली आहे.
याच प्रश्नावर शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जलसिंचन भवन अहमदनगर येथेही प्रदक्षिणा आंदोलन व मुक्काम ठोको आंदोलन केले होते.त्यामुळे हा प्रकल्प तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. सर्व शेतकरी उत्साहात व आनंदात होते.या सर्व नाशिक दौऱ्याचे नियोजन ९ गावातील शेतकऱ्यांनी स्वतःहून केले होते त्याचा मोठा आनंद होत आहे असेही सौ.काकडे म्हणाल्या.यापुढेही या गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळेपर्यंत अशाच प्रकारचा पाठपुरावा या काकडे दांपत्याच्या मार्गदर्शनाखाली चालूच राहील असे कृती समितीच्या शेतकऱ्यांनी यावेळी म्हटले आहे.