अकोले ग्रामीण रूग्णालयात नवजात मुलींचा सन्मान!

रोटरी क्लब अकोले सेंट्रल चा उपक्रम
अकोले प्रतिनिधी —
अकोले ग्रामीण रूग्णालयात नवजात मुलींचा सन्मान करत रोटरी क्लब अकोले सेंट्रल ने स्त्री जन्माचे स्वागत करुन स्त्री भ्रुण हत्या होऊ न देण्याची शपथ घेतली.
रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने नेहमी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम घेतले जातात.रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. स्वाती हेरकल यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्याच्या प्रोजेक्ट चेअरमन डॉ. सुधा कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दि १७ सप्टेंबर रोजी रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने ‘स्त्री जन्माचे स्वागत- कन्या जन्म आनंद सोहळा ‘हा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी रोटरी क्लब अकोलेचे वतीने ग्रामीण रुग्णालय अकोले येथे प्रसुती होऊन मुलीला जन्म दिलेल्या माताचा सत्कार करुन त्यांना नवजात मुलीला लागणाऱ्या बेबी किट भेट देण्यात आली .व गुलाब पुष्प, पेढे वाटण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे अध्यक्ष रो. सुनील नवले, सेक्रेटरी रो. विद्याचंद्र सातपुते, उपाध्यक्ष रो. डॉ. जयसिंग कानवडे, खजिनदार रो. दिनेश नाईकवाडी, संस्थापक अध्यक्ष रो. अमोल वैद्य, माजी अध्यक्ष रो. सचिन देशमुख, रो. सचिन आवारी,रो. सचिन शेटे,रो. डॉ. रविंद्र डावरे, रो.निलेश देशमुख,माजी खजिनदार रो.रोहिदास जाधव,रो. अमोल देशमुख, रो. संदीप मालुंजकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.बाळासाहेब मेहेत्रे, संदीप शेणकर, अल्ताफ शेख,उपस्थित होते.

याप्रसंगी रोटरी क्लब अकोलेचे सचिव प्रा.विद्याचंद्र सातपुते म्हणाले की,आज समाजात मुलांबरोबर मुलीही कोणत्याही क्षेत्रात कमी नाही.प्रत्येक क्षेत्रात मुलींनी नावलौकिक मिळवलेला असतानाही समाजात मुलीच्या जन्माविषयी सकारात्मक कमी आहे.अनेक भ्रुण हत्या करण्याच्या घटना घडत आहे .त्यामुळे समाजात अनेक प्रश्न तयार झालेले आहेत, होत आहेत.मुलीच्या जन्माविषयी समाजात जागृकता होणे गरजेचे आहे.म्हणूनच आज रोटरी क्लब अकोले सेंट्रल ने मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा उपक्रम घेतला असल्याचे सांगितले.
यावेळी रोटरी क्लब अकोलेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आपण आपल्या कुटुंबात एकही स्त्री भ्रुण हत्या करणार नाही याची दक्षता घेऊ व समाजातील या स्त्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी शपथ घेतली.
याप्रसंगी ग्रामीण रूग्णालयातील परिचारक आकाश देसाई,सह सर्व परिचारका व कर्मचारी तसेच नवजात मुलीचे माता पिता व नातेवाईक उपस्थित होते.