इतर

सावरगाव पाट चे सुपुत्र अमोल नेहे यांना राज्यस्तरीय कृषी मार्गदर्शक पुरस्कार

अकोले प्रतिनिधी

सावरगाव पाट (ता.अकोले) चे सुपुत्र अमोल रामदास नेहे यांना शेतकरी पुत्र फाउंडेशन चा कृषि मार्गदर्शक या विभागातील राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला

अहमदनगर येथे पद्मश्री बिजमाता मा.राहिबाई पोपरे,पद्मश्री मा.पोपटराव पवार(सरपंच आदर्श गाव हिवरेबाजार), गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मा.कैलास राऊत, मा.किशोर भणगे (अध्यक्ष युवा काँग्रेस नेवासा) यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
शेतकऱ्यांना माती परिक्षणाचे महत्त्व,मोफत पीक सल्ला,शासकीय योजनांची माहिती,वृक्षारोपण मोहीम,कीटकनाशके व बुरशीनाशके यांचा योग्य वापराबद्दल जनजागृती,जैविक कीड नियंत्रण याबद्दल जनजागृती.पंढरपूर,दौंड येथे कार्यरत असताना शेतकऱ्यांशी नाळ जोडून केलेल्या कार्याची दखल घेऊन शेतकरी पुत्र फाउंडेशन ने त्यांना हा पुरस्कार दिला..याअगोदर त्यांना महाराष्ट्र कृषि पदवीधर संघटनेचा राज्यस्तरीय युवाप्रताप पुरस्कार निसर्ग व पर्यावरण संवर्धन या विभागात मिळाला होता. सध्या ते श्रमिक ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे हॉर्टिकल्चर विभाग येथे कार्यरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button