इतर

सर्वोदय विदया मंदिर राजुर येथे माजी विदयार्थी मेळावा संपन्न.

अर्थजनाबरोबरच चांगला माणुस होणे गरजेचे- प्रकाश टाकळकर.



अकोले/प्रतिनिधी-
मातीशी असणारी नाळ कधीच तुटु देऊ नका.माजी विदयार्थी हे भावी पिढी घडविणारे उदयाचे पालक आहेत.म्हणुनच अर्थजनाबरोबरच चांगला माणुस होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य तथा सत्यनिकेतन संस्थेचे संचालक प्रकाश टाकळकर यांनी केले.
गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजुर येथे सन २०१०-११या शैक्षणिक वर्षातील विदयार्थी मेळावा संपन्न झाला.यावेळी प्रकाश टाकळकर विचारमंचावरून बोलत होते.
याप्रसंगी माजी उपप्राचार्य तथा अगस्ती कारखान्याचे संचालक विलास नवले,कुंदा नवले,एन.आर.वाकचौरे,मुख्याध्यापक बादशहा ताजणे,प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे यांसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते.


प्रकाश टाकळकर यांनी पुढे बोलताना संख्येपेक्षा गुणवत्ता हि मोलाची आहे. सामाजिक संस्कृतीतुन आपण घडतो.सर्वोदयाचा विचार हेच संस्कार झाले आहेत.माणुसकी टिकविण्याचे काम आपण केले.सत्कारात जिव्हाळा,आपुलकी,प्रेम आहे.सत्कार दिर्घकाळ स्मरणात राहील.असे विचार व्यक्त करून कुटूंब उद्धस्त होत चाललेत त्यासाठी सोशियल मिडीयाचे वेसन बंद करण्याचे आव्हान केले.
प्रा.विलास नवले यांनी पुढे जात असताना मागे वळुन पाहीले पाहीजे.कोणतेही काम करायचे असेल तर मार्गदर्शक असावे लागतात.आईची प्रेरणा होती,परिस्थिती गिरीबीची होती. परंतु महत्त्वाची जाणीव शिक्षण प्रत्येकाने घेतले पाहीजे.परिस्थितीशी झुंज दिली पाहीजे.आलेला प्रत्येक विदयार्थी शिकला पाहिजे.चांगले संस्कार झाले पाहीजे.हेच खरे रागाचे,माराचे कारण आहे.असे विचार प्रतिपादीत करून माजी विदयार्थी हा महत्त्वाचा दुवा आहे.प्रश्न कोणताही असो माजी विदयार्थी खंबीर उभे राहतात याची आत्मीयता आहे.त्यासाठी एक वेगळी ओळख निर्माण करा.विश्वासास पात्र व्हा.प्रामाणिकपणे काम करा.कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचे भाग्य मिळाल्याचे गौरोद्गार काढले.


एन.आर.वाकचौरे यांनी सर्वोदय विदयालयातील पायाभुत सुविधांमुळे विदयार्थी घडले.त्यासाठी दृष्टीकोन योग्य असावा. क्षेत्र कोणतेही असो शिस्त महत्त्वाची आहे.आपण आपल्यावर विश्वास ठेवावा.जे काही करतो त्याचा अभिमान बाळगावा असे मत व्यक्त केले.
मुख्याध्यापक बादशहा ताजणे यांनी आम्ही घडलो,तुम्ही सुद्धा घडा.यासाठी एकत्र येणे ही भाग्याची गोष्ट आहे.सुसंस्कृत पिढी घडवणे हाच मानस आहे.हाच खऱ्या अर्थाने सन्मान असल्याचे विचार व्यक्त केले.
विदयालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,जेष्ठ शिक्षक संतोष कोटकर आदींनी मार्गदर्शनपर मत व्यक्त केले.
माजी विदयार्थी यांनी आपले विचार व्यक्त करत विद्यालय,शिक्षक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्ती केली. तसेच विदयालयास वॉटरप्युरिफायर भेट दिले.
यावेळी विलास नवले यांची अगस्ती कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याने तसेच शरद तुपविहिरी यांचा वाढदिवस असल्याचे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
माजी विदयार्थी यांच्याकडून प्रत्येकाचा फेटा तसेच पुष्पकुंडी देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संतराम बारवकर यांनी केले.सुत्रसंचलन दत्ता अगविले यांनी केले.तर अश्विनी बांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी योगेश मेमाणे,सोमनाथ ढगे,विलास हिले,भगवंत पिचड,सागर नवाळी, किसन धिंदळे,सचिन पडवळे,निलेश गोंदके,महादु हिले,दत्ता अगविले,अश्विनी बांडे,हौसा भांगरे,सविता सुकटे,निर्मला असवले यांसह माजी विदयार्थी उपस्थित होते.
स्वागत गिताने कार्यक्रमाची सुरूवात तर भोजनाने शेवट करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button