नेप्तीत श्री गणेशाची स्थापना , पावसासाठी विघ्नहर्त्याला साकडे

अहमदनगर – नगर तालुक्यातील नेप्ती गाव व परिसरातील वाड्या वस्त्यावर लाडक्या गणपती बाप्पाचे ‘गणपती बाप्पा मोरया, ‘एक दोन तीन चार,गणपतीचा जयजयकार, या जय घोषणात ढोल- ताशाच्या गजरात , गुलाल व फुलांच्या पाकळ्याची उधळण करीत पंधरा (15 )पेक्षाही जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाची उत्साहात भक्तीभावात स्थापना केली .
ढोल ताशाच्या गजरात सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाचे वाजत ,गाजत व नाचत स्वागत केले. ट्रॉली व टेम्पो मधून गणेश मूर्तींना घेऊन जाताना कार्यकर्त्यांचा उत्साह नजरेत भरवणारा होता .यामध्ये तरुण कार्यकर्ते व मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता .या गणेश उत्सवानिमित्त विविध मंडळांनी सांस्कृतिक, सामाजिक व धार्मिक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे .

सकाळपासून घरगुती बाप्पांचे आगमन करण्यात आले. त्यांसाठी सर्व कुटुंबीयांची लगबग सुरू होती. बाजारपेठेत गणरायाच्या मनमोहक आणि आकर्षक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. या सह विद्युत माळा आकर्षक फुलांच्या माळा यांनी ही दुकाने साजरी होती .सायंकाळी गावातील व परिसरातील वाड्यावर वस्तीवरील सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल ताशाच्या गजरात शासकीय नियमाचे पालन करून लाडक्या बाप्पाची स्थापना केली .नेप्ती येथील माळ गल्लीतील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात वेताळ बाबा मित्र मंडळ व द किंग ग्रुप व समता परिषदेच्या वतीने विधिवत पूजा चर्चा करून समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले मा. सरपंच अंबादास पुंड ,भानदास फुले प्रा. भाऊसाहेब पुंड यांच्या हस्ते श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली . भर पावसाळ्यात पावसाने दांडी मारल्यामुळे पिके सुकू लागली आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याचा व मुक्या जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चांगल्या पावसासाठी श्री गणेशाची पूजाअर्चा करून तसेच आरती करून विघ्नहर्ता कडे चांगला पाऊस पडण्याची प्रार्थना केली.
यावेळी समता परिषदेचे शाखा अध्यक्ष शाहूराजे होले ,आ.निलेश लंके प्रतिष्ठानचे तुषार भुजबळ, सौरभ भुजबळ, तुकाराम होले ,राहुल भुजबळ , कुणाल शिंदे, अमित दरेकर ,हर्षल चौरे, रमेश रावळे, सार्थक होले, दर्शन फुले, मिलिंद होले ,सिद्धार्थ शिंदे ,तेजस नेमाणे, आदित्य पुंड ,ओंकार भुजबळ ,भैय्या सप्रे, सचिन दरेकर ,नितीन शिंदे यदि सह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .