शफी बोल्डेकर यांना दैनिक ” एकमत “चा कृतज्ञता सन्मान

लातूर प्रतिनिधी
लातूर येथून प्रकाशीत पुरोगामी विचाराचे दैनिक ” एकमत ” च्यावतीने सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून समाजोपयोगी विविध उपक्रम राबवून समाजसेवेचे कार्य करणा-यांचा यथोचित सन्मान हिंगोलीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिलहाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला.
यावेळी समाजसेवा कृतज्ञता सन्मान ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक साहित्यिक शेख शफी बोल्डेकर यांना प्रदान करण्यात आला.हा कृतज्ञता सन्मान सोहळ्यासाठी दैनिक एकमतचे जिल्हाप्रतिनिधी आय.डी.पठाण गोरेगांवकर , कळमनुरी तालुका प्रतिनिधी मुजीब पठाण , अमोल जैन यांच्या उपस्थिती होती . या यशाबद्दल शेख शफी बोल्डेकर यांचे ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्थेचे अध्यक्ष हाशम ई. पटेल , उपाध्यक्ष खाजाभाई बागवान , सचिव डॉ. सय्यद जब्बार पटेल , सहसचिव अनिसा सिकंदर शेख , कार्याध्यक्ष प्रा.डाॅ. रफी शेख , विश्वस्त जाफरसाहाब शेख , शेख इस्माईलसर , महासेन प्रधान , पुणे जिल्हाध्यक्ष बा.ह. मगदूमसाहाब , लातूर जिल्हाध्यक्ष इक्बाल रसूलसाहाब आदिंनी अभिनंदन केले.