ज्ञानेश्वर डगळे यांना राज्यस्तरीय दिव्यांग ऊर्जा पुरस्कार!

अकोले/ प्रतिनिधी–
अकोले तालुक्यातील चिंचवणे येथील रहिवासी ज्ञानेश्वर डगळे यांचा राज्यस्तरीय दिव्यांग ऊर्जा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असणारे कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी नुकताच शिवुर्जा प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यातआला
श्री डगळे हे कोहंडी येथे प्राथमिक शिक्षक पदावर काम करत आहे.गेली अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रातील विशेष काम व सामाजिक बांधिलकी जपत आहे . स्वतः अस्थिव्यंग असताना सामाजिक क्षेत्रात दिव्यांगासाठी अपंग प्रमाणपत्र, सर्वशिक्षा अभियान अंतर्गत शिष्यवृत्ती योजना,तीन चाकी सायकल, काठी,कुबड्या ,बुट त्यांनी मिळवून दिल्या आहेत.तसेच घरकूल योजना,संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभ व युआयडी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई सलग चार वेळा सर केले आहे. क्रीडा विविध गुणदर्शन स्पर्धेसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारी गावचे सरपंच श्री.खाडे सर तर पुरस्कारांचे वितरण संस्थेचे अध्यक्ष कचरू चांभारे व अंकूश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातून अनेक दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———-