राजापूर महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश अभियानात अमृत कलश कार्यक्रम साजरा

संगमनेर प्रतिनिधी
प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालय, राजापूर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे: राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दि.23 सप्टेंबर 2023 रोजी मेरी माटी, मेरा देश अमृत कलश ‘ हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख अतिथी प्राचार्य राहुल देशमुख सर ( प्राचार्य, Law कॉलेज संगमनेर ) या कार्यक्रमात मा प्राचार्य राहुल देशमुख सर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थानी राष्ट्रीय एकात्मता व देश सेवेसाठी आपले योगदान दिले पाहिजे असा महत्त्वपूर्ण संदेश दिला
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री पुंजाहारी देवराम हासे साहेब (मा. अ. प्रागतिक शिक्षण संस्था राजापूर) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग सर समवेत सर्व विद्यार्थ्यांनी अमृत कलश मध्ये एक मूठ माती टाकतांना आपला सेल्फी काढून शासनाच्या लिंकवर अपलोड केला.
या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा रविंद्र गोफणे, उपप्राचार्य सुभाष वर्पे नॅक कॉर्डिनेटर संगीता जांगिड मॅडम व इतर सर्व प्राध्यापक व प्रशासकिय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापिका शीतल वाळुंज यांनी मानले तर कार्यक्रम सूत्रसंचलन कु. गौरी भोकनळ या विद्यार्थिनीने केले.