सर्वोदयाच्या तीन कुस्ती मल्लांची राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड.

अकोले प्रतिनीधी
पारनेर तालुक्यातील भाळवणी या ठिकाणी अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघाची निवड चाचणी संपन्न झाली.या निवड चाचणीमध्ये अकोले तालुक्यातील गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथील तीन कुस्ती मल्लांची राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यामध्ये इयत्ता दहावीमधील बोऱ्हाडे जयेश गणेश याने ४५ किलो वजनगटात तर मुर्तडक सुरज संजय याने ४८ किलो वजनगटात सुवर्णपदक मिळविले आहे.
त्याचप्रमाणे इयत्ता बारावी मधील दातखिळे प्रतीक एकनाथ याने ५१ किलो वजनगटात सुवर्णपदक मिळविले आहे.
या सर्व कुस्ती मल्लांनी सुवर्ण कामगिरी करून त्यांची तीन ऑक्टोंबर या दिवशी नाशिक येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.हे सर्व कुस्ती मल्ल राजूर येथील भारतीय खेळ प्राधिकरण नवी दिल्ली यांनी दत्तक घेतलेल्या ऍड .एम.एन. देशमुख महाविद्यालय येथे साई कुस्ती सेंटर मध्ये प्रशिक्षण घेत आहेत.या सर्व कुस्ती मल्लांना आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच तान्हाजी नरके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या नेत्रदीपक यशाबद्दल कुस्ती मल्ल तसेच मार्गदर्शक कुस्ती कोच यांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख,सचिव एम.एल.मुठे ,कोषाध्यक्ष विवेकजी मदन,संचालक टी.एन.कानवडे,एस.टी.येलमामे,मिलिंदशेठ
उमराणी,विजय पवार, श्रीराम पन्हाळे,सर्व संस्था पदाधिकारी,शिक्षण निरिक्षक लहानू पर्बत,प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख,प्राचार्य बादशहा ताजणे,उपप्राचार्य दिपक बुऱ्हाडे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले आहे.