शेवंगावात हजारो महिलांच्या उपस्थितीत रंगला न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
गप्पा, गाणी, हास्य, रंजक खेळ खेळत सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा महिलांसाठीच्या सदाबहार कार्यक्रमासाठी शेवगांव येथील हजारो महिलांनी सहभाग नोंदवत कार्यक्रमात सहर्ष भाग घेतला, कार्यक्रमामधील महिलांचा भन्नाट उत्साह वाखाणण्याजोगा होता. शेवगांव मध्ये प्रथमच सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नव युवतींपासुन ८१ वर्षाच्या आजी पर्यंतच्या अनेक महिलांना कार्यक्रमात भाग घेतला. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या संकल्पनेतून माजी आमदार राजीवजी राजळे मित्र मंडळ शेवगावच्या वतीने न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमासाठी सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर तसेच बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री माळेगावकर स्वतः उपस्थित राहून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यासाठी व्हर्लपूल फ्रिज व मानाची पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी सॅमसंग वॉशिंग मशीन व मानाची पैठणी, तर तृतीय क्रमांकासाठी आयवा कंपनीचा एलईडी ३२ इंची टीव्ही व मानाची पैठणी बक्षीस तसेच ५०उत्कृष्ट सहभागी खेळाडूंना आकर्षक पैठणी भेट व प्रश्नमंजुषा बक्षीस चांदीचे नाणे व नोंदणीकृत १० महिलांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक पैठणी याप्रमाणे बक्षिसे देण्यात आली.

आमच्या महिला भगिनी दिवसरात्र संसाराच्या कामात, मुलाबाळांच्या देखरेखीत नेहमीच व्यस्त असतात. माता – भगिनींना या सर्व व्यापातून बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मा.आमदार राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने खास महिलांसाठी खेळ पैठणीचा “न्यु होम मिनिस्टर” या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते, या कार्यक्रमात महिला भगिनी, युवती यांनी क्रार्यक्रमात जल्लोषाच्या वातावरणात सहभाग घेत ‘हम भी किसी से कम नही’ हे दाखवुन दिले.
आमदार मोनिकाताई राजळे यांनी या कार्यक्रमात उस्फुर्त महिलांनी भाग घेतला व अनेक महिलांनी आपल्या वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून बक्षिसे मिळवली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले तसेच आ.राजीव राजळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य यांनी उत्कृष्ठरीत्या कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी भाजपा महिला पदाधिकारी व शेवगांव शहर व ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवलेल्या वैशाली ओमकार झाडे यांना व्हर्लपूल फ्रिज व मानाची पैठणी, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या प्रज्ञा सचिन डुकरे यांना सॅमसंग वॉशिंग मशीन व मानाची पैठणी, तर तृतीय क्रमांक मिळवणा-या प्रतीक्षा दिगंबर भवार यांना आयवा कंपनीचा एलईडी 32 इंची टीव्ही व मानाची पैठणी देण्यात आली.