सर्वोदय विदया मंदिर राजुर येथे गणरायाला निरोप.

राजूर/प्रतिनिधी-
निरोप देतो देवा आम्हा आज्ञा असावी,चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी.आभाळ भरले होते तु येताना,आता डोळे भरून आलेत तुला पाहुन जाताना.गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या.या घोषणाने तसेच विदयालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व माजी, आजी विदयार्थी यांच्या सहकार्याने तसेच राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रविण दातरे,पोलिस उपनिरिक्षक शेख,सर्व पोलीस बांधव यांच्या शिस्तबद्ध बंदोबस्तात राजुर येथील गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाने संस्कृती व परंपरेचे दर्शन देत गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला.
याप्रसंगी लेझीम,झांज,टिपरी,झेंडा,मुखवटे,हंडा कळशी इ.पथकांची लयबद्ध नृत्य व गितगायन साजरी करण करण्यात आले.झांज पथकासाठी रामशेठ पन्हाळे यांच्याकडून झांज व स्पोर्ट ड्रेससाठी सौजन्य लाभले.
मिरवणुक दरम्यान सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख यांच्या सुनबाई सानवी देशमुख,भगिनी गोपीका,चि.विनायक, संचालक मिलिंदशेठ उमराणी,विजय पवार,प्रकाश महाले,माजी प्राचार्य श्रीनिवास एलमामे,एम.के.बारेकर यांनी भेट देऊन नृत्यांवर ठेका धरला.
पुढे मिरवणुकीत संताजी तेली मित्रमंडळाचे सुधिरशेठ चोथवे व इतर कार्यकर्त्यांनी सर्व विदयार्थांना केळी वाटप केले.
श्रीमंत अवधुत मित्रमंडळाचे अध्यक्ष संतोष सपकाळ,उपाध्यक्ष प्रविण पन्हाळे,गोरख माळवे,गोविंद बांगर,पुष्कर सोनार,दर्शन ओहोरा,प्रविण गायकवाड यांनी मिरवणुकीचे स्वागत व सत्कार केले. तसेच पाणी व चॉकलेट वाटपाची व्यवस्था केली.सचिन मुंढे, पुष्कर सोनार,सर्वोदय कला व क्रिडा मंडळ,सरकार यंग फ्रेंड सर्कल, गुरूदत्त प्रतिष्ठान आदींनी पाण्याची व्यवस्था केली.
ग्रामपंचायती समोर सरपंच पुष्पाताई निगळे, अॅड.दत्तात्रय निगळे यांनी स्वागत केले. दरम्यान रमेश मुतडक यांसह राजुर पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.गावात पथक सादरीकरण दरम्यान लाईटची सोय उपलब्ध करून दिली.
शेवटी पोलीस स्टेशनजवळ सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण दातरे यांच्या हस्ते महाआरती संपन्न होऊन गणपती बाप्पाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
