पैठण सेवा सोसायटीची वार्षिक सर्वसाधरण सभा खेळीमेळीत सम्पन्न

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील पैठण येथील पैठण आदिवासी विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी च्या वातावरणात पार पडली गावचे हनुमान मंदिरात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन रामा पांडू बुळे हे होते
प्रारंभी संस्थेचे अहवाल वाचन संस्थेचे सचिव गणपत गोडे यांनी केले व मागील तेरिज ताळेबंद वाचून दाखविला विषय पत्रिके वरील सर्व विषयांना यावेळी मंजूरी देण्यात आली 31 मार्च अखेर संस्थेला 11 लाख 96 हजार चा नफा झाला असून संस्थेला नवीन इमारत बांधकाम करणे बाबत चर्चा झाली
चेअरमन रामा पांडू बुळे दूध संघाचे माजी संचालक विठलंराव डुंबरे ,खरेदिविक्री संघाचे संचालक निलेश तळेकर माजी सरपंच जगदीश तळेकर , संचालक भाऊसाहेब तळेकर यांनी चर्चेत भाग घेतला
यावेळी संचालक तात्याभाऊ तळेकर , दत्तात्रय भांगरे
किसन बुळे, सोमा गंभीर ,भिका मेचकर , चहादू आढळ , भाऊसाहेब तळेकर, दत्तू तळेकर बाळासाहेब संगारे साळू बाई। भांगरे नंदा बाई लां घी कर्मचारी उत्तम साबळे संतोष चौधरी बादशहा तळेकर आदी सह सभासद उपस्थित होते