वनकुटे सोसायटीच्या चेअरमनपदी ज्ञानेश्वर गागरे, व्हा. चेअरमन विठ्ठल काळनर!

वनकुटे सेवा सोसायटी आदर्श करणार :
डॉ. नितीन रांधवन
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
तालुक्याच्या राजकारणात राजकीय दृष्ट्या महत्त्वपुर्ण ठरलेल्या वनकुटे सेवा सोसायटीच्या पदाधिकारी निवडी गुरुवार दि. ३० जून रोजी पार पडल्या. यावेळी चेअरमन पदी ज्ञानेश्वर बबन गागरे व व्हा चेअरमन विठ्ठल पंढरीनाथ काळनर यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.
या सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये
ग्रामदैवत चरपटीनाथ महाराज परिवर्तन पॅनलचा श्री चरपटीनाथ ग्रामविकास सहकार पॅनलने धक्कादायक १३/० ने पराभव केला होता. व ही निवडणूक राजकीय दृष्ट्या तालुक्यात महत्वपूर्ण व चर्चेची ठरली होती. वनकुटे सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक कौशिक औटी, भिवा केसकर, अशोक गागरे, सोनबा गोरे, मच्छिंद्र पठारे, गणेश मुसळे, मच्छिंद्र खामकर, ताराबाई गागरे,
लक्ष्मीबाई वाबळे, सुर्यभान औटी, काशिनाथ बुचुडे, हे आहेत.
दरम्यान वनकुटे सेवा सोसायटी मध्ये श्री चरपटीनाथ ग्रामविकास सहकार पॅनलच्या सर्व १३ जागा निवडून आणण्यासाठी वनकुटे येथील ग्रामस्थ सेवा सोसायटीचे सर्व सभासद
यांनी विशेष परिश्रम घेतले.
वनकुटे सेवा सोसायटीवर ग्रामस्थांनी आम्हाला निवडून देत जो विश्वास टाकला आहे तो सार्थकी करण्यासाठी ग्रामीण भागातील वनकुटे सेवा सोसायटी ही आदर्श सेवा सोसायटी म्हणून नावलौकिक करण्यासाठी प्रयत्न करून शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व समस्यांना खऱ्या अर्थाने न्याय देणार आहे.
डॉ. नितीन रांधवण
..