व्यसनमुक्तीचा संदेश देत आबासाहेब काकडे फार्मसीच्या गणरायाचे विसर्जन

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शिक्षणासोबतच नेहमी सामाजिक व सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील आबासाहेब काकडे फार्मसी कॅम्पसच्या पाच दिवसीय गणरायाला भव्य अशी मिरवणूक काढून निरोप देण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी मिरवणुकीमध्ये फलकांच्या व नाटकाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती व वृक्षारोपणाचा संदेश दिला.मिरवणूकीत लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. अतिशय शिस्तप्रिय मिरवणूक व उत्तम लेझीम संचालन हे मिरवणुकीचे वैशिष्टय़ होते.
काकडे फार्मसीची गणेश विसर्जन मिरवणूक बोधेगाव व परिसरात प्रसिद्ध असल्याने मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. लेझीम पथकाचे नियोजन प्रा.सोमनाथ वडघने यांनी केले तर कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा.आसीफ शेख,अमोल सुपेकर, विक्रम सारूक, देवीदास खराद यांनी काम पाहिले.
यावेळी बी फार्मसीचे प्राचार्य डॉ.हेमंत गांगुर्डे, डी फार्मसीचे प्राचार्य राजेश मोकाटे, प्रा. भरत जाधव, प्रा.सोमनाथ डावखर, प्रा. संदीप बडढे, संदीप खंडागळे, कमलेश कदम, आकाश मिसाळ, विजय पवार,प्रा.प्राजक्ता भस्मे, जयश्री कोकाट, पुजा आहेर, अश्विनी नांगरे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.