शिर्डी येथे ३० सप्टेंबर ला मराठा महासंघाची वार्षिक सभा व मेळावा

शिर्डी – अखिल भारतीय मराठा महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा, युवा उद्योजक, शेतकरी व विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन शनिवार, दि. ३० सप्टेंबर रोजी शिर्डी येथे करण्यात आले आहे
अशी माहिती राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश देशमुख यांनी दिली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे २०२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे तर मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमसाठी उपाध्यक्ष विनायक पवार, वसंतराव मुळीक, राष्ट्रीय खजिनदार प्रमोद जाधव, राष्ट्रीय चिटणीस गुलाब गायकवाड, युवा प्रतिनिधी आतिष गायकवाड, महिला प्रतिनिधी भारती पाटील यांच्यासह विभागीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या सभेसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सारथी संस्थेच्या विविध योजनांचा युवा उद्योजक, शेतकरी व विद्यार्थी मार्गदर्शन मेळावा होईल. तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल तसेच नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवा उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी व महिला भगिणींनी उपस्थित राहण्याचे आवाहन लालूशेठ दळवी, उत्तर जिल्हाध्यक्ष प्रकाश निर्मळ, दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, सरचिटणीस रमेश बोरूडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी केले आहे.