२४ ऑक्टोबरला कोरठण खंडोबाचा सोमवती अमावस्या उत्सव

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
:- लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा ता. पारनेर जि अहमदनगर या राज्यस्तरीय’ ब’ वर्ग तीर्थक्षेत्रावर २४ ऑक्टोबरला कोरठण खंडोबाचा सोमवती अमावस्या उत्सव संपन्न होणार आहे.
दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर येत असलेल्या सोमवती अमावस्या पर्वणीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या निमित्ताने सकाळी ६ वा.कोरठण खंडोबा मंगल स्नान पूजा, स.७ वा. अभिषेक पूजा, स. ८ वा.महाआरती, स.११ वाजलेपासून सोमवती पर्वणीचा महाप्रसाद वाटप श्रीमती छबुबाई लक्ष्मण पुंडे रा पिंपळगाव रोठा यांच्या वतीने अन्नदान हॉलमध्ये सुरू होईल
दिवसभर भाविकांचे देवदर्शन, कुलधर्म ,कुलाचार व तळी भंडार कार्यक्रम चालू राहील. साय. ४ वा.सोमवती पर्वणीच्या पवित्र गंगा स्नानासाठी देवाच्या उत्सव मूर्तीचे पालखी मिरवणुकीने मंदिरातून टाक्याच्या दाऱ्याकडे प्रस्थान होईल. साय. ५.३० वा. अमावस्या पर्वकाळात टाक्याच्या दरा येथे उत्सव मूर्तींचे पवित्र गंगास्नान ब्रह्मवनदाच्या मंत्रघोषात संपन्न होईल. सार्वत्रिक तळीभंडार, देवभेट व महाआरती झाल्यावर पालखी मिरवणुकीने मंदिराकडेपरतेल

उत्सवासाठी पिण्याचे पाणी, दर्शन व्यवस्था ,पार्किंग व्यवस्था नियोजन असून जय मल्हार विद्यालय महाप्रसाद वाटपाची सेवा करतील.
तरी सर्व भाविक भक्त यांनी मोठ्या संख्येने सोमवती पर्वणीला कुलदैवतांचे देवदर्शन, पालखी मिरवणूक, उत्सव मूर्तींचे गंगास्नान आणि महाप्रसाद यांचा लाभ घ्यावा असे निवेदन देवस्थान तर्फे अध्यक्षा सौ शालिनी घुले, उपाध्यक्ष महेश शिरोळे ,मा अध्यक्ष ॲड.पांडुरंग गायकवाड ,सचिव जालिंदर खोसे, सहसचिव कमलेश घुले, खजिनदार तुकाराम जगताप, विश्वस्त रामदास मुळे, राजेंद्र चौधरी ,चंद्रभान ठुबे, महादेव पुंडे, सुवर्णा घाटगे,धोंडीभाऊ जगताप,अजित महांडुळे, दिलीप घुले,सुरेश फापळे तसेच सर्व माजी विश्वस्त व अन्नदाते परिवार यांनी केले आहे.