अकोले तालुक्यातील फोफसडी येथे दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू !

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील फोफसंडी येथे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील हे पर्यटक असल्याची माहिती हाती आली आहे आज फोफसंडी येथे दुचाकी वर फिरत गेले होते दुपारी दोन ते अडीच वाजनेचे सुमारास हे चार पर्यटक मित्र फोफसंडी गावाजळ असणाऱ्या एका ओढ्यावर पाणवठा या ठिकाणी पाण्यात उतरले असता एकाचा पाय घसरला आणि पाण्यात बुडू लागला असता दुसऱ्याने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली पण यात दोघंही बुडाले सोबत आलेले दुसरे दोघा मित्रांनी गावात जाऊन हि माहिती गावकऱ्यांना दिली त्यांना नंतर काही गावकरी या घटनेकडे धाऊन आले बुडालेले दोघांचा शोध सुरू केला आहे मात्र अद्याप त्या तरुण पर्यटकांचा शोध लागला नाही
पाणवठा येथे पाण्याची खोली जास्त असल्याने यात हे पर्यटक बुडाले फोफसंडी हे अतिदुर्गम निसर्ग रम्य ठिकाण असल्याने या ठिकाणी राज्य भरातून अनेक पर्यटक पर्यटना साठी येत असतात
सध्या अकोले तालुक्यात जोरदार पाऊस पडत असल्याने निसर्गाचे सौंदर्य व आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक इकडे आकर्षित होत आहे नेटवर्क नसल्याने ही माहिती लवकर इतरांना समजली नाही प्रशासकीय यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली असुन त्यांचे शोध कार्य सुरू आहे
—-////