महाराष्ट्र

महार वतनाच्या जमिनी परत करण्यासाठी आझाद मैदानावर आरपीआय चे उपोषण

अकोले प्रतिनिधी

महार वतनाच्या जमिनी वतनदारांना वारसांना परत करण्यासाठी आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे

आझाद मैदान, मुंबई येथे दिनांक.२०/०१/२०२४ रोजी आरपीआय उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, श्री. शशिकांत दारोळे,अकोले तालुका अध्यक्ष विजय पवार राधाकीसन रुपवते आदी कार्यकर्ते आमरण उपोषणासाठी बसणार आहे.याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी मुख्यमंत्री यांनी निवेदन दिले आहे
निवेदनात म्हटले आज की
गावातील प्रतिष्ठित समाजाने, राजकारणी सावकारांनी नॉन बॅकवर्ड जमातीच्या
लोकांची महार वतनाच्या जमिनी कवडीमोल भावात, विकत घेतल्या आहेत. त्या सर्व जमिनी वतनदारांना परत करून त्यांना रिस्टोर कराव्यात

महार वतनाच्या जमिनी वतनदारांना वतनदारांच्या वारसांना परत करा. महार वतनाच्या जमिनीवरील लागलेले कुळ रद्द करा. महार वतन जमिनींचे अनधिकृतपणे झालेले खरेदीचे व्यवहार रद्द करा. महार वतन जमिनी पुन्हा महार वतनदारांना हस्तांतरीत करा.
वतनदार किंवा त्यांचे वारस यांचे उपजिविकेचे साधना पासुन वंचीत रहात आहे. महार वतनाच्या जमिनी प्रतिष्ठीत समाज्यातल्या लोकांनी कवडीमोल भावात विकत घेतल्या आहेत किंवा कुळकायद्याने जमिनीवर ताबा मिळविला आहे. बऱ्याचा महार
वतनी जमिनी बेकायदा किंवा कायद्याने रदद् होऊ शकणारे हस्तांतरण मागासवर्गीय समाजा व्यतिरिक्त (नॉनबेकवर्ड) जमातीच्या कब्जात गेल्या असून ते नवीन शर्ती
विरोधी कृत्य आहे. तसचे अनधिकृत ताबा असलेल्या जमिनी त्या सर्व जमिनी बेकायदेशीर हस्तांतरण केवळ १०० रू.च्या स्टॅम्पवर कोणतेही खरेदीखत न करता
मागासवर्गीय समाजातील अशिक्षीतपणाचा गैरफायदा घेवुन परस्पर पैशाचा वापर करून तलाठयाद्वारे नोंदी करून घेतलेल्या असुन सदरच्या नोंदी हया बेकायदेशीर व
कायद्याला अनुसरून नाहीत अशा सर्व जमिनी महार समाजाला परत रिस्टोर करण्यात याव्यात. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे दिनांक.२०/०१/२०२४ रोजी उत्तर महाराष्ट्र-अध्यक्ष, श्री. शशिकांत दारोळे विजय पवार राधकीसन रुपवते आमरण उपोषणासाठी बसणार असल्याचा इशारा निवेदनात दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button