इतर

माजीमंत्री लोकनेते मधुकरराव पिचड यांना युनिव्हर्सिटी ऑफ् सेन्ट्रल अमेरिका ची डी . लिट् .


————————————————-
अकोले प्रतिनिधी

दि युनिव्हर्सिटी ऑफ् सेन्ट्रल अमेरिका ची डी . लिट् , लोकनेते – माजीमंत्री मधुकरराव पिचड यांना नुकतीच जाहीर करण्यात आली असून , पिचड यांच्या आजवरच्या सामाजिक एकता तसेच शैक्षणिक क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ् लेटर्स ( डी . लिट् ) ही गौरवशाली पदवी जाहीर झाली आहे .

अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर , सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख , अगस्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . भास्कर शेळके , निवृत्त उपप्राचार्य – साहित्यिक डॉ . सुनील शिंदे , मुख्याध्यापक बी . एच् . पळसकर , शिक्षणाधिकारी एस् . पी . मालुंजकर यांनी पिचड यांच्या या संस्मरणीय बहुमानाबद्दल त्यांचा राजूर येथील निवासस्थानी सत्कार केला .

‘ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जीवनसाधना गौरव पुरस्कारापाठोपाठ मधुकरराव पिचड यांचा शैक्षणिक क्षेत्रातील डी . लिट् . ने झालेला हा गौरवास्पद सन्मान म्हणजे पिचड यांच्या आजवरच्या ग्रामीण – आदिवासी भागातील सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील दखलपात्र – क्रांतिकारी कामगिरीवरील सर्वोच्च विद्याशाखेची एकप्रकारे सुवर्ण मोहर आहे ‘ , अशी भावना प्राचार्य डॉ . भास्कर शेळके आणि डॉ . सुनील शिंदे यांनी याप्रसंगी व्यक्त केली .

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कायम विश्वस्त , माजी आमदार वैभवराव पिचड , गिरजाजी जाधव , स्वीकृत विश्वस्त एम् . डी . सोनवणे , उद्योजक सुरेश कोते , संपतराव वैद्य तसेच अध्यक्ष सुनील दातीर , सेक्रेटरी सुधाकर देशमुख आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी आणि अनेक मान्यवरांनी पिचड यांचे अभिनंदन केले आहे . 📚📚

----------------------------------------------

🗒🗒

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button