इतर
श्री क्षेत्र गुंफा येथील श्रीरंग रामभाऊ माने यांचे निधन

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव-नेवासा रोड वरील श्री क्षेत्र गुंफा येथील प्रगतशील शेतकरी श्रीरंग रामभाऊ माने (वय ५५ )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे, भाऊ, भाऊजाई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. धार्मिक वृत्तीचे व शांत मनमिळावू स्वभावाचे होते.
त्यांच्या जाण्याने भातकुडगाव फाटा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका मार्गदर्शक तथा ज्येष्ठ पत्रकार आर. आर. माने यांचे ते बंधु होते.