आजचे पंचांग दिन विशेष व राशिभविष्य दि ०६/१०/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन १४ शके १९४५
दिनांक :- ०६/१०/२०२३,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:१३,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- सप्तमी समाप्ति ०६:३५,
नक्षत्र :- आर्द्रा समाप्ति २१:३२,
योग :- परीघ समाप्ति २९:३०,
करण :- बालव समाप्ति १९:१८,
चंद्र राशि :- मिथुन,
रविराशि – नक्षत्र :- कन्या – हस्त,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:४८ ते १२:१७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:५१ ते ०९:१९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:१९ ते १०:४८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:१७ ते ०१:४६ पर्यंत,
❀ दिन विशेष:
कालाष्टमी, अष्टमी श्राद्ध, मध्याष्टमी श्राद्ध, दग्ध ०६:३५ नं.,
————–
:
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन १४ शके १९४५
दिनांक = ०६/१०/२०२३
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
घरात सजावटीची कामे कराल. आपल्या स्मरणशक्तीचा फायदा होईल. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल. धनलाभाचे योग जुळून येतील. मित्रांशी गप्पा मारण्यात वेळ घालवाल.
वृषभ
काही नवीन शिकण्याचा योग येईल. स्वत:ला कामात गुंतवून घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. मित्रांची बाजू जाणून घ्या. घरात टापटीप ठेवाल.
मिथुन
कौटुंबिक मदत लाभेल. दिवस समाधानात जाईल. महत्त्वाच्या कामाची अंमलबजावणी कराल. आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष नको. हस्त कलेसाठी वेळ काढावा.
कर्क
हातातील काम जिद्दीने पूर्ण कराल. व्यापार्यांची जुनी कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. नातेवाईकांची गाठ पडेल. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.
सिंह
सल्ला मागणार्यांना योग्य मार्गदर्शन करा. प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. समोरील गोष्टीत आनंद माना. घरगुती खर्च आटोक्यात ठेवा.
कन्या
कामाचा ताण लक्षात घ्यावा. घरगुती गप्पांमध्ये गुंग व्हाल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. चर्चेतून मार्ग काढता येईल. जोडीदाराची बाजू जाणून घ्या.
तूळ
दिवसभर कामात अडकून राहाल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीने बोलाल. झोपेची तक्रार राहील. आजचा दिवस चांगला जाईल.
वृश्चिक
लहान प्रवास घडेल. दिवस संमिश्र जाईल. रागाला आवर घालावी. मन विचलीत करणार्या घटना घडू शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे.
धनू
हातातील काम मनापासून करावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. तरुण वर्गाकडून काही शिकायला मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक भावना वाढीस लागेल.
मकर
सर्व खात्री करूनच जबाबदारी घ्या. बाहेर फिरताना सतर्क राहावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करा. व्यापारीवर्ग खुश राहील. कमिशन मधून लाभ कमवाल.
कुंभ
नवीन कामासाठी संकल्प करावा. अनावश्यक खर्च टाळावा. बोलताना भान राखावे. संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक अडचणींकडे लक्ष द्या.
मीन
विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. अनावश्यक खर्च टाळावा. मनातील निराशेला दूर सारा.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर