अहमदनगर

आ.लंके यांच्या यशस्वी प्रयत्नातुन राळेगण थेरपाळ येथील गोसावी समाजास मिळाला न्याय !

बहुचर्चीत गोसावी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न सुटला !

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा गोसावी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्नाबाबत सदर समाजातील समाज बांधवांनी अनेक वेळा लेखी व प्रत्यक्ष स्वरूपात मागणी करूनही त्यांना न्याय मिळू शकला नाही .पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके साहेब यांनी सदर प्रकरणात लक्ष घालत गोसावी समाजाच्या समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला व राळेगण थेरपाळ येथील ग्रामपंचायत सदस्य पै.बाजीराव कारखिले यांच्या माध्यमातुन पाठपुरावा करत, चार वर्षापासून प्रलंबित असलेला गोसावी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेच्या प्रश्नांची सोडवणूक केली .
राळेगण थेरपाळ येथील गोसावी समाजाच्या स्मशानभूमीची जुनी जागा ही गावठाण पिण्याच्या पाण्याची विहिरी लगत होती .परंतु पाणी दुषित होते हा विषय गावकरी यांनी ग्रामसभेत घेऊन गोसावी समाजा पुढे मांडला असता, कुठलाही विलंब ना करता गोसावी समाजाच्या वतीने होकार देण्यात आला. व ग्रामस्थांनीही पर्यायी जागा देण्याचा शब्द दिला.व त्या नंतर ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाले व त्या मुळे सत्ताधाऱ्यांनी पाच गुंठे जागा देऊ असा मुद्दा मांडला होता .परंतु पै.बाजीराव कारखिले (ग्रा.पं. सदस्य) यांनी आमदार निलेश लंके यांचेकडे हा मुद्दा मांडला आसता आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली गोसावी समाजाला पंधरा गुंठे क्षेत्र उपलद्ध करून देत गोसावी समाज बांधवांना न्याय मिळवून दिला .
आ. लंके यांच्या मध्यस्थिने हकिगतपुर या ठिकाणी सब स्टेशन लगत 15 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली. आमदार निलेश लंके यांच्या हस्ते या संधर्भात मंजुरी पत्रही देण्यात आले .व लवकरच संरक्षण भिंत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही या वेळी आ. लंके यांनी दिले .असे गोसावी समाजाच्या वतीने किरण अरण्ये व अक्षय अरण्ये यांनी सांगितले.
यावेळी आ.लंके यांच्या समवेत सुखदेव कारखिले ,पै.बाजीराव कारखिले, किरण कारखिले, किरण भ. कारखिले , युवा नेते संतोष कारखिले,पै किरण अरण्ये ,अक्षय अरण्ये,बाळासाहेब अरण्ये, गणेश कारखिले, विठ्ठल कारखिले, संतोष डोमे,सतीश गाडीलकर, संदीप कारखिले मा.सरपंच,उमेश अरण्ये, वाल्मीक अरण्ये,सुरज अरण्ये, पै.सुनिल सोनवणे, रायचंद कारखिले, विठ्ठल कारखिले, मेजर संतोष अरण्ये, दशरथ अरण्ये, राहुल अरण्ये, कुमार अरण्ये, बबलु अरण्ये, निलेश अरण्ये, नितीन अरण्ये, संभाजी अरण्ये,आदी मान्यवर उपस्थित होते .
गेले अनेक वर्ष प्रलंबित असणारा गोसावी समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेचा प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल आमदार निलेश लंके व बाजीराव कारखिले यांचे गोसावी समाजाच्या समाज बांधवांनी धन्यवाद व्यक्त करत आभार मानले.


गावच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून आमदार निलेश लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर आम्ही ग्रामसेवा करत आलेलो आहे .गोरगरीब दीनदलित समाजाला आपल्या पदाच्या माध्यमातून न्याय देता येईल असे कार्य करा अशी शिकवन देणारे , तसेच सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी ठामपणे आमच्या पाठीशी उभे राहणारे आमदार निलेश लंके साहेबांचे मोलाचे योगदान व सहकार्य मिळत असल्यामुळे. आमदार निलेश लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मतदारसंघात माझ्यासारखे शेकडो तरुण जे कार्य करतात त्यातुन आम्हा तरुणांना समाज कार्य करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते . त्या सकारात्मक ऊर्जेमुळेच माझ्या गावातील गोसावी समाज बांधवांना आमदार साहेबांच्या माध्यमातुन मला न्याय देता आला . त्या बद्दल माझ्या राळेगण थेरपाळ परिवाराच्या व गोसावी समाज बांधवांच्या वतीने मी आमदार लंके साहेब यांचे आभार व्यक्त करतो .

पै.बाजीराव कारखिले
( ग्रा.पं.सदस्य राळेगण थेरपाळ )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button