पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे उमाजी नाईक यांची जयंती साजरी

स्वातंत्र्य चळवळीतील राजे उमाजी नाईक यांचे कार्य प्रेरणादायी : विलास साठे
पारनेर/प्रतिनिधी
: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३१ व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत वासुंदे येथील स्व.अण्णाकाका पाटील सभागृहात राजे उमाजी नाईक यांचे प्रतिमा पूजन व स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी वासुंदे ग्रामपंचायत सदस्य विलास साठे म्हणाले की स्वातंत्र्य चळवळीमध्ये राजे उमाजी नाईक यांनी भरीव असे कार्य केले. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होत स्वतंत्र चळवळीच्या माध्यमातून इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात लढा दिला. यावेळी आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या कार्याचा यावेळी आढावा घेतला.
याप्रसंगी वासुंदे ग्रामपंचायत मध्ये जयंतीनिमित्त प्रगतिशील शेतकरी भाऊ सैद, उपसरपंच शंकर बर्वे, चेअरमन नारायण झावरे, ग्रामपंचायत सदस्य विलास साठे, रामदास झावरे, मा. चेअरमन दिलीप पाटोळे, लहानूभाऊ झावरे, शांताराम दाते, बाळासाहेब पाटील, पंढरीनाथ झावरे, पोपटराव हिंगडे, युवा नेते सचिन सैद, जय मल्हार क्रांती संघटनेचे पारनेर तालुका अध्यक्ष गणेश शिरतार, बाळासाहेब वाबळे, सूर्यभान झावरे, दत्तात्रय बर्वे, भाऊसाहेब जगदाळे, रामदास शिरतार, धोंडीभाऊ शिरतार, कोंडीभाऊ शिरतार, पै.दत्ता जगदाळे, गणेश बर्वे, गणेश झावरे, शंकर झावरे, अक्षय जेडगुले, किरण पोपळघट, कुलदीप शिरतार, मयूर शिरतार, बाबाजी शिरतार, किसन जेडगुले, मेजर विशाल शिरतार, शुभम जेडगुले, विनायक जेडगुले, सचिन साठे, गणेश जेडगुले, राजेंद्र शिरतार, करण शिरतार, पै.सुमित औटी, सुनिल चव्हाण, दत्तात्रय शिरतार, ऋषिकेश शिरतार, गोरख जेडगुले, शरद शिरतार, भाऊसाहेब जेडगुले, देवजी जेडगुले, सोनू जेडगुले, दगडू शिरतार, सुदाम माकरे, खंडू शिरतार, बाळू चव्हाण, शुभम जेडगुले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.