सायकल दुकानाची साठी १० लाखाची मागणी, छळास कंटाळून विवाहितेने घरातच घेतला गळफास!

सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दत्तात्रय शिंदे
नेवासा- दिनांक 25 सप्टेंबर रोजी नेवासा तालुक्यातील सोनई येथे एका विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली
संजय निवृत्ती गोसावी रा. वेळापुर तालुका
कोपरगाव यांनी पोलिसांत फिर्यात दिली त्यात म्हटले आहे की माझी मुलगी दिशा हिचे सोनई येथील किरण रवींद्र गोसावी याच्याशी काही दिवसापूर्वी विवाह झाला होता त्यांना एक तीन वर्षाचा मुलगा देखील आहे त्यांचे सोनई शहरात सायकल रिपेरिंग चे व विक्रीचे दुकान आहे काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण झाल्याने संबंधित दुकानास जागा कमी पडत असल्यामुळे जागा खरेदीसाठी तुझ्या माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये असे सांगून तिच्यासोबत भांडण करत असे
दिनांक 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मुलगी दिशा हिचा फोन आला सासू ननंद आशा दोघी मिळून माझ्यासोबत वाद घालत आहे तुम्ही सोनई येथे या अन्यथा मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन नंतर सायंकाळी सहा वाजता माझा मुलगा लक्ष्मण
जावई किरण यांनी फोन करून सांगितले की माझी पत्नी दिशा हिने घराच्या छतास गळफास घेतला आहे त्यानंतर आम्ही सर्वजण नगर येथील सरकारी रुग्णालयात गेलो असता डॉक्टरांनी मुलगी दिशा हिला मयत घोषित केले
त्यावरून सोनई पोलीस ठाण्यात पती किरण रवींद्र गोसावी, सासरे रवींद्र मच्छिंद्र गोसावी, सासू आशाबाई
रवींद्र गोसावी, आनंद प्रियंका अभिजीत गोसावी दीर गणेश रवींद्र गोसावी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षण माणिक चौधरी हे करीत आहेत