भायगाव येथे पकडला अति विषारी कोब्रा नाग

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भायगाव – मजलेशहर रोडवरील अभिजीत आढाव यांच्या शेतातील घराजवळील जनावरांच्या गोठ्यामध्ये कोब्रा जातीचा अतिविषारी नाग सकाळीच आढळून आला. यासंदर्भात शेवगाव येथील सर्पमित्र उमेश भालेराव यांना नवनाथ लोखंडे यांनी फोनवरून माहिती दिल्यानंतर काही वेळातच ते भायगाव येथील आढाव वस्तीवर पोहोचले. पाच ते सहा फुट लांबीचा अतिविषरी नागाला पकडून प्लास्टिकच्या बरणीत बंद केले.सापा विषयी समाजामध्ये असलेल्या अंधश्रद्धा दूर होणे गरजेचे आहे. साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती झाली पाहिजे ती काळाची गरज आहे.
यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यामध्ये अभिजीत आढाव संभाजी कडूस, नवनाथ लोखंडे, संजय आरगडे, जयराम शेळके, संतोष लांडे, हर्षद नेव्हल, पंकज कोल्हापुरे, वैभव आढाव, दत्ता आढाव, पांडुरंग उभेदळ,पत्रकार शहाराम आगळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
कोणत्याही जातीच्या सापाला मारू नका…..
साप हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत. त्यांच्याविषयी मनात असलेली भीती काढून टाका त्यांना मारून नष्ट करू नका.आपल्या तालुक्यात उपलब्ध असलेल्या सर्पमित्रांना माहिती दिल्यास ते येऊन सापाला पकडून घेऊन जातील व ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती नाही अशा ठिकाणी त्यांना पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून देतील. तुम्ही या सापाला न मारता मला बोलावल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो.
सर्पमित्र उमेश भालेराव
शेवगाव