दुधाचे पेमेंट न दिल्यास…तर प्रभात डेअरी ला टाळे ठोकण्याचा इशारा

नेवासा प्रतिनिधी।
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील शेतकर्यांचे दूधाचे पेमेंट न दिल्यास प्रभात ला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे
मागील दिनांक ०१/०९/२०२३ पासून दिनांक १७/१०/२०२३ पर्यंत अद्याप ही पेमेंट झाले नाही.डेअरी चालकास व प्रभात डेअरी मॅनेजर,कर्मचारी यांना वारंवार सांगून ही अद्याप पेमेंट जमा झाले नसून जाणीवपूर्वक शेतकर्यांना वेठीस धरून प्रभात डेअरी मॅनेजर,कर्मचारी शेतकर्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात…
शेतकर्यांना सांगतात कि तुम्हाला काय करायाच ते करा पेमेंट भेटणार नाही.संबंधित शेतकर्यांचे दुधाचे पेमेंट दोन दिवसात जमा न झाल्यास जीवन ज्योत फाऊंडेशन वतीने श्रीरामपूर येथील प्रभात डेअरी लिमिटेड,गेट क्रमांक १२१/२अ संबंधित मुख्य कार्यालय फोडण्यात येईल व ताळे ठोकण्यात येईल.असा इशारा देण्यात आला.
निवेदन सारंगधर रामचंद्र निर्मळ(संस्थापक/अध्यक्ष प्रभात डेअरी लिमिटेड),मुख्यमंञी एकनाथ शिंदे साहेब यांना पाठविण्यात आले आहे.या वेळी जीवन ज्योत फाऊंडेशन चे कमलेश नवले पाटील,अक्षय बोधक,प्रदिप आरगडे,आप्पासाहेब आरगडे,अभिजीत बोधक,नरेंद्र नवथर,प्रतिक आरगडे,संकेत बोधक,अक्षय आरगडे,सिद्धांत आरगडे,श्रीरामपूर चे सामाजिक कार्यकर्ते प्रविण कोल्हे,अनेक कार्यकर्ते व सौंदाळा,भेंडा,नागपूर,देवगाव ग्रामस्थ उपस्थित होते.