पै. श्रुती कोकणे ची भटिंडा पंजाब येथे अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड

भारतीय विद्यापीठ संघटना नवी दिल्ली (AIU) आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ (ऑल इंडिया) मुली कुस्ती स्पर्धा भटिंडा पंजाब येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात प्रागतिक शिक्षण संस्थेचे, नूतन कला महाविद्यालयाची कुस्तीपटू पै.श्रुती कोकणे (एफ. वाय. बी.एस्सी ) ची निवड झाली आहे.
या स्पर्धा गुरु काशी विद्यापीठ भतींडा पंजाब येथे 14 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान संपन्न होणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग प्रागतिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड.अनिल एन. गोडसे, उपाध्यक्ष श्री. रामनाथ पुंजाजी हासे, सेक्रेटरी ऍड. कैलास हासे, संस्थेचे सर्व संचालक मंडळ, संस्थेचे मार्गदर्शक श्री. विश्वनाथ रामभाऊ नवले तसेच कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब विश्वनाथ नवले तसेच सर्व संचालक मंडळ व नूतन परिवाराने अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पै.श्रुती कोकणेच्या निवडी बद्दल पंचक्रोशी मध्ये सर्वत्र अभिनंदन होत आहे.पै. श्रुती कोकणेला शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक प्रविण गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले.