त्या आरोपीला तातडीने अटक करा अन्यथा राजूर पोलिस स्टेशन वर आंदोलन-मारूती मेंगाळ.

अकोले/प्रतिनिधी–
अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील चाळीसगाव डांगाण समजल्या जाणाऱ्या उडदावणे परिसरात 5 तारखेला आदिवासी समाजाच्या 16 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा दुर्दैवी प्रकार घडला आहे.
राजूर पोलिस स्टेशन ला या बाबत 5 तारखेला संबंधित आरोपीवर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला असताना सुद्धा आरोपीला अटक केलेली नाही.त्याच्या निषेधार्थ आज आदिवासी भागातील चाळीसगाव गाव डांगण परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी अकोले मतदार संघाचे युवा नेते माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली राजूर पोलिस स्टेशन चे प्रमुख अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक प्रविण दातरे यांना या बाबतचे निवेदन दिले
.आरोपीला अटक न केल्यास 26 तारखेला या घटनेच्या निषेधार्थ राजूर पोलिस स्टेशन वर आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलन केले जाईल.या बाबतचे निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी सुरेश भाऊ पथवे ,देविदास खडके,मारुती सोमा मेंगाळ,सखाराम गांगड,संदीप डोके, बाळासाहेब फोडासे,अशोक उघडे,बच्चू गांगड,पांडूरंग उघडे,पांडू सोंगळ,सरपंच श्री.पोकळे,चंदर उघडे,शांताराम उघडे,रावजी मधे, यासहित आदी कार्यकर्ते उपस्थित होते.