महालक्ष्मी हिवरे येथे ज्वारी पिकांची पन्नास एकर वर पेरणी

दत्तात्रय शिंदे:
माका/नेवासा
तालुका कृषी अधिकारी धंनजय हिरवे यांचा मार्गदर्शनाखाली मौजे महालक्ष्मी हिवरे येथे ज्वारी पिकांची फुले सुचित्रा या वाणाचे सलग पन्नास एकर वर पेरणी झाली
महालक्ष्मी हिवरे येथिल मोरंडी हे ज्वारी पिकासाठी तालुक्यात नावाजलेल क्षेत्र असून मागील काही काळात पिक लागवड प्रमाण फार कमी झाले होते परंतु तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे महालक्ष्मी हिवरे तसेच तालुक्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जीवदान ठरले या मुळे कमी पाण्याच्या भागात पण आज ज्वारी हे पिक हिरवेगार बहरलेलं दिसते ज्वारी हे पीक शरीरासाठी उत्तम तसेच गुणकारी असून दुहेरी उपयोगात येणारे पीक म्हणून ओळख आहे ज्वारी पिकापासून जनावरणा कडबा पण होणारं आहे ज्वारी पिकांना बाजारात चांगल भाव असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आर्थिकस्थर उंचावणारे पीक ठरणार आहे फार कमी खर्चात तसेच कमी पाण्यावर येणार पीक म्हणुन ज्वारी या पिकांची ओळख आहे, तालुक्यात ज्वारी पिकांची लागवड क्षेत्रात वाढ करण्यासाठी उपाययोजना केल्या
ज्वारीला चांगला भाव मिळत असल्याने ज्वारी उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचे कल वाढत असून ज्वारी पिकामुळे जनावरांचे चाऱ्यांच प्रश्न पण सुटत आहे गावात ज्वारी पीकांचे प्रकल्प घेऊन शेतकरी समूह करण्यात आले सलग ज्वारी पिकांची पेरणी केल्यामुळे बांधावर जाऊन शेतीशाळा अंतर्गत पेरणी पासून पेरणी पश्चात कीड, रोग व खताचे योग्य नियोजन त्याचप्रमाणे पंचसृती तत्वाच उपयोग करून कमीत कमी खर्चात उत्पादन घेण्यावर भर देण्यात आले या कामी मंडळ कृषी अधिकारी सोनवणे कृषी पर्यवेक्षक बर्डे, कृषी सहायक आर.पी.पवार यांनी गावात भेटी व सभा घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे असे नवनाथ शेतकरी बचत चे अध्यक्ष अमोल निर्मळ यांनी सांगितले
ज्वारी हे पीक पारपरिक पीक असून कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे तसेच कमी पावसात येणार पिक आहे त्यामुळे महालक्ष्मी हिवरे येथिल कमी पाण्याचे क्षेत्र मोरडी येथील शेतकऱ्यांचं सभा घेऊन शेतकऱ्यांचं समूह तयार करुन महाडीबीटी वर आँनलाईन अर्ज करण्यासाठी प्रवृत्त करुन मोफत फुले सुचित्रा हे बियाण देण्यात आले आज चांगल्या प्रकारे पीक आल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिकस्थर उंचावण्यास मदत होणार आहे
बी.टी.सोनवणे
मंडळ कृषी अधिकारी घोडेगाव