आजचे पंचांग व राशिभविष्य दि २८ ०४/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०८ शके १९४४
दिनांक :- २८/०४/२०२२,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४९,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति २४:२७,
नक्षत्र :- उत्तराभाद्रपदा समाप्ति १७:४०,
योग :- वैधृति समाप्ति १६:२८,
करण :- गरज समाप्ति १२:२२,
चंद्र राशि :- मीन,
रविराशि – नक्षत्र :- मेष – भरणी,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- प्रतिकूल दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०२:०२ ते ०३:३८ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:०५ ते ०७:४१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:२७ ते ०२:०२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०२ ते ०३:३८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:१३ ते ०६:४९ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
प्रदोष, भद्रा २४:२७ नं.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०८ शके १९४४
दिनांक = २८/०४/२०२२
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)
मेष
मनाची चंचलता वाढू देऊ नका. कामाच्या ठिकाणी अधिकार वाणीने वागाल. घरगुती वातावरण चांगले राहील. व्यावसायिक चिंता मिटू शकतील. व्यावसायिक प्रगती साधता येईल.
वृषभ
अधिकार वाणीने बोलाल. कर्तृत्वाला चांगला वाव मिळेल. धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. आपल्या जवळील ज्ञानाचा सदुपयोग करता येईल.
मिथुन
मुलांची काळजी लागून राहील. उधारीची कामे टाळावीत. अचानक धनलाभ संभवतो. ठरवलेली कामे सुरळीत पार पडतील. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.
कर्क
अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नवीन मित्र जोडाल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.
सिंह
मनातील शंका काढून टाकाव्यात. जोडीदाराशी जुळवून घ्यावे लागेल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. पत्नीच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. भागीदाराशी मतभेद वाढवू नका.
कन्या
हातातील कामावर अधिक लक्ष ठेवावे. छुप्या शत्रूंच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवावे. नातेवाईकांना मदत कराल. भांडणात सहभाग घेऊ नका. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळावे.
तूळ
कामाची धांदल उडेल. मनाची द्विधावस्था टाळावी. मुलांच्या स्वतंत्र विचारांचा रोख जाणून घ्यावा. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा.
वृश्चिक
कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. नवीन कामात अधिक लक्ष घालावे. पत्नीशी मतभेद वाढवू नका. भागीदारीत नवीन योजना आखाव्यात.
धनू
अधिकाराचा योग्य ठिकाणीच वापर करावा. कामातून समाधान शोधावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. अती साहस करायला जाऊ नका. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा.
मकर
नातेवाईकांशी मतभेद वाढू शकतात. काही बदल अनपेक्षित असू शकतात. इच्छा नसतांना प्रवास करावा लागू शकतो. मनातील नैराश्य दूर सारावे. अडथळ्यातून मार्ग काढता येईल.
कुंभ
चटकन रागवू नका. पित्तविकाराचा त्रास जाणवू शकतो. निराशाजनक विचारांना मनात थारा देऊ नका. शांततेचे धोरण स्वीकारावे लागेल. कौटुंबिक वातावरणात रमून जाल.
मीन
दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. क्षुल्लक शंकांना मनात थारा देऊ नका. वादविवादात सहभागी होऊ नका. नवीन कामे अंगावर पडतील. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर