विद्यार्थी गुणगौरव सोहळा, सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न !!

!! विद्यार्थी गुणगौरव सोहळा, सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न !!
धरणगाव.जि. जळगाव :- दि.९ ऑक्टोबर, २०२६, रोजी सुकमल मंगल कार्यालय धरणगाव.जि.जळगाव येथे, कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र प्रदेशसंचलित, धरणगाव ता.परिसर कुंभारसमाज आयोजित, विद्यार्थी गुणगौरव, आदर्श माता,समाजभूषण,कर्मयोद्धा, कार्यक्रम संपन्न झाला.
कुंभार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गोरोबाकाका यांच्या प्रतिमेचे पाहुण्यांच्या हस्ते पूजन केल्यानंतर, वरील कार्यक्रमाचे आयोजक, कार्यकारणीतील पदाधिकारी, यांच्या हस्ते, मंत्री महोदय, सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, तसेच राज्याच्या विविध भागातून आलेल्या पदाधिकारी, यांचा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री गुलाबरावजी पाटील, तसेच वरील कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच कुंभार स.सामा.सं. महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष – श्री सतीश दादा दरेकर तसेच सामा.संस्थेचे प्रदेशाध्यक्ष- श्री रमाकांतजी क्षीरसागर, यांच्या हस्ते कुंभार समाजात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या, समाज बांधव माता-भगिनींचा, शाल, पुष्पगुच्छ, पुरस्कार ट्रॉफी, सन्मानपत्र, देऊन सत्कार करण्यात आला.
🎯 आदर्श माता पुरस्कार :-१) गं.भा बायजाबाई महादू कुंभार. (पाळधी ) २) सौ.लीलाबाई सतीश कुंभार (सुळे) ३) सौ शांताबाई व श्री राजाराम शंकर कुंभार ( अमळनेर)
🎯 समाजभूषण पुरस्कार १) श्री रमेश नामदेव गायकवाड (नाशिक) २) श्री एकनाथ सुपडू कुंभार (पाळधी) ३) श्री भीमराव मांगो कुंभार (धरणगाव) ४) श्री मोहन राघो कुंभार,(चोपडा)
🎯 कर्मयोद्धा पुरस्कार:-श्री संदीप भिका सोनवणे (नाशिक)🎯 आदर्श सरपंच पुरस्कार:-सौ मनीषा जितेंद्र कुंभार (ऊत्रान).
सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, श्री सतीश दादा दरेकर, प्रदेशाध्यक्ष श्री रमाकांतजी क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतातून मा.ना. श्री गुलाबरावजी पाटील यांच्यासमोर.
कुंभार समाजाचा पिढीजात मातीकला व हस्तकला व्यवसाय टिकवून त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे.
समाजातील युवकांना व व्यावसायिकांना स्वयंरोजगारासाठी सुलभ व कमी व्याजदरात कर्जे उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे.
नवीन तंत्रज्ञान, मार्केटिंगचे कौशल्य आणि दर्जेदार उत्पादन निर्मितीसाठी युवकांना प्रशिक्षण देणे, जेणेकरून त्यांना बाजारपेठेत योग्य संधी मिळू शकतील.
कुंभार समाजाच्या सर्वागीण विकासा साठी संत गोरा कुंभार आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा प्रस्ताव येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घ्यावा अशी विनंती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील साहेबाना करण्यात आली.
येत्या 15 दिवसानी माझ्या बंगल्यावर या मी स्वतः तुमच्याबरोबर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे येतो आणि kumbhar समाजासाठी महामंडळ करून घेतो असे
गुलाब राव पाटील साहेबानी आपल्या भाषणातून सांगितले
वरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामा. संस्थेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष-श्री चंद्रशेखर कापडे यांनी केले, सूत्रसंचालन सामा. संस्थेचे जळगाव जिल्हा प्र.सरचिटणीस-श्री सखाराम मोरे.यांनी केले.



