कोतुळ येथील संगीत भजन संप्रदायातील क्षेत्रातील आवाज हरपला!

कोतुळ प्रतिनिधी
कोतूळ पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ साधक, उत्कृष्ट गायक-वादक ह.भ.प. शिवनाथ रामचंद्र वाकचौरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरातील वारकरी संगीत भजनातील आवाज हरपला अशा अशा भावना व्यक्त होत आहे
त्यांच्या निधनाने वारकरी,संगीत संप्रदायातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ह.भ.प. शिवनाथ वाकचौरे यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाची परंपरा जपत भक्तिमार्गाची सेवा केली. काकडा, हरिपाठ, नित्यनेमाचे भजन तसेच संगीत भजन यांमध्ये त्यांना विशेष रुची होती. सुरेल आवाजाने आणि संगीताच्या जाणिवेने त्यांनी परिसरात गायक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली होती.
भक्तिसेवेबरोबरच सुतारकाम करणारे ते एक उत्तम कारागीर म्हणूनही परिचित होते. मिस्त्रीकामातील कौशल्य आणि मेहनती वृत्तीमुळे त्यांचा परिसरात लौकिक होता. त्यांच्या पश्चात पत्नी, व्यावसायिक कालिदास, भानुदास, अनिल व कोतुळ ग्रामपंचायत चे माजी सदस्य प्रकाश वाकचौरे ही चार मुले, सुना आणि नातवंडे असा असा परिवार आहे



