रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे रायला शिबिर

नाशिक दि 9
शालेय विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व व संवाद कैशल्य विकासासाठी रायला शिबिर रोटरी क्लब ऑफ नाशिक आयोजित करत असते. ह्यवर्षीचा पहिले रायला शिबीर आडगाव येथील माउंट लिटरो झी स्कूल येथे रविवार दि ६/१०/२४ रोजी संपन्न झाला.
शिबिरासाठी माध्यमिक समाज सुधार समिती संचलित माध्यमिक आश्रम शाळा म्हसरूळ बोरगड येथील ५१ विद्यार्थी ह्यात सहबागी झाले . शिबारासाठी विद्यार्थ्यांची निवड शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रोहिणी पाटील , श्री शेवाळे , सौ पी ए पाटील, सौ व्ही टी पाटील ह्या शिक्षकांनी गुणवत्तेच्या आधारे केली .
कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ नाशिक माजी अध्यक्ष दिलीपसिंह बेनिवाल,नियोजित अध्यक्ष गौरव सामनेरकर,पवन जोशी,मोना सामनेरकर हे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना विविध साहसी खेळ खेळण्यासाठी माउंट लिटरो झी स्कूल च्या संचालिका सुचित्रा माने,मुख्यध्यापिका रिमा अहिरे हायनी मार्गदर्शन केले.
अंतराळ संशोधक व शास्त्रज्ञ अविनाश शिरोडे ह्यानी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
शिरोडे ह्यानी आपण छोट्याश्या खेड्यात व अशिक्षित कुटुंबात जन्माला येऊन ११ वी पर्यंत शिक्षण ग्रामीण भाग येथे केल्याचे व उच्च शिक्षण शिक्षण पुणे व बंगलोर येथे केल्याचे सांगितले.
आज प्रश्न विचारण्याची जिज्ञासा व धाडस हे विद्यार्थ्यांनी आत्मसात केल्यास ते उद्याचे यशस्वी शास्त्रज्ञ व उत्तम नागरिक बनू शकतात असे विविध यशस्वी व्यक्तींचे दाखले देवून त्यानी स्पष्ट केले.
अविनाश शिरोडे ह्याना भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम,सतीश धवन हायांच्यासमवेत भारताच्या पहिल्या रॉकेट एसएलव्ही ३ ह्या मोहिमेत योगदान देता आल्याने आपले जीवन सार्थक झाल्याचे नमूद केले.
विद्यार्थ्यांना यशोशिखर घटण्यात गुरूचे मार्गदर्शन व पालकांचे संस्कार मोलाचे असल्याचे सांगितले.

रोटरी क्लब ऑफ नाशिक चे अध्यक्ष ओमप्रकाश रावत ह्यानी रायला हि संकल्पना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसाठी पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे व तसे नियोजन केल्याचे सांगितले.
रोटरी क्लब ऑफ नाशिक चे सचिव प्रकल्प हेमराज राजपूत ह्यानी सूत्र संचलन केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय रोटरी क्लब ऑफ नाशिक चे जनसंपर्क संचालक निलेश सोनजे ह्यानी केला.
आभार प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ नाशिक सचिव प्रशासन शिल्पा पारख ह्यानी केले.