नेवासा- शेवगाव राज मार्गावर भातकुडगाव फाटा चौफुल्यावर साखळी उपोषण!

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव -नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा चौफुल्यावर कामधेनु पतसंस्थेच्या समोरील प्रांगणात सकल मराठा समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्या आवाहनानुसार साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली.
सुरुवातीला श्री क्षेत्र भावी निमगाव येथील जगदंबा मातेच्या चरणी श्रीफळ वाढवून व छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून त्यानंतर भातकुडगाव फाटा येथे नियोजित ठिकाणी साखळी उपोषणसुरू करण्यात आले.
अंतरवाली सराटी येथे १७ दिवसाच्या उपोषणा नंतर शासनाला दिलेल्या चाळीस दिवसाची मुदत संपली. तरीही मराठा आरक्षणावर कुठलाही निर्णय न झाल्याने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषण सुरू केले आहे.

या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणामध्ये सर्वस्वी जोहरापूरचे माजी सरपंच अशोक देवढे, भायगावचे सरपंच राजेंद्र आढाव, भातकुडगावचे माजी सरपंच शंकरराव नारळकर, प्रहाराचे तुकाराम शिंगटे, प्रहारचे तालुका अध्यक्ष रामभाऊ शिदोरे, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे उपस्थित आहेत.
यावेळी परिसरातील शिवशाहीर कल्याण काळे, भातकुडगावचे माजी सरपंच राजेंद्र फटांगरे, विठ्ठलराव फटांगरे, राष्टीय भारूडकार हमीद सय्यद, बक्तरपुरचे सरपंच राहुल बेडके, भविनिमगावचे सरपंच आबासाहेब काळे, गणेश खंबरे, विठ्ठल फटांगरे, देवदान वाघमारे, गणेश शिंदे, रविंद्र खरड, शिवाजी उभेदळ, डॉ.महेश दुकळे, उस्मानभाई सय्यद, गोरखनाथ शेळके, रामदास बडे, नारायण आढाव, बाबासाहेब लव्हाळे, हरिचंद्र जाधव, गणेश जाधव, संजय आहेर, दादासाहेब देवढे, अशोक पंडित, अशोक घुमरे,आदींनी उपस्थित राहून पाठिंबा दिला आहे.
भातकुडगाव फाटा परिसरातील गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी करून तशा आशयाचे फलक गावाच्या प्रवेशद्वारावरच लावून शासनाचा तीव्र निषेध केला आहे.साखळी उपोषणास लेखी पत्र देऊन पाठिंबा दर्शविला आहे. या संदर्भातील अनेक गावच्या ग्रामपंचायत सरपंचांनी पाठिंब्याचे पत्र साखळी उपोषणस्थळी येऊन दिले आहे.